कोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरी

By: Editor_Manas

On: Thursday, April 30, 2026 3:47 PM

Google News
Follow Us

पुणे: कोरिया प्रजासत्ताकाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासातर्फे ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ या जागतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालय आणि कोरियन ब्रॉडकास्टिंग सिस्टम (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुण्यातील किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती कोरियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत क्येओंगबेओम किम आणि किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउंजू लिम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्येओंगबेओम किम म्हणाले, “भारतासाठीची प्राथमिक फेरी २८ जून २०२६ रोजी पुण्यातील किंग सेजोंग इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. या स्पर्धेद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना कोरियाची भाषा, संस्कृती, इतिहास आणि समाज याबाबतचे ज्ञान सादर करण्याची संधी मिळणार असून, कोरियाबद्दलची आवड वाढविण्याचा उद्देश आहे. ‘क्विझ ऑन कोरिया’ हा दक्षिण कोरिया सरकारचा प्रमुख सांस्कृतिक उपक्रम आहे. जगभरातील कोरियन दूतावासांमार्फत प्राथमिक फेऱ्या घेतल्या जातात आणि प्रत्येक देशातून एक विजेता अंतिम फेरीसाठी कोरियात सहभागी होतो.”

पुण्यातील प्राथमिक फेरीतील विजेता भारताचे प्रतिनिधित्व अंतिम फेरीत करणार असून, अंतिम फेरीतील स्पर्धकांना कोरियन संस्कृतीचा अनुभव घेण्यासह तेथील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातही सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 12, 2026

October 12, 2026