रायडर्सच्या उत्साही आणि नवीन पिढीसाठी टीव्हीएस मोटरकडून; टीव्हीएस रॅडियन

By: Editor_Manas

On: Tuesday, October 13, 2026 4:36 PM

Google News
Follow Us

बेंगळुरू, 13 ऑक्टोबर 2026: भारतात सणासुदीच्या काळाची सुरुवात होत असताना, दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या निर्मितीमधील जागतिक आघाडीची कंपनी आणि टीव्हीएस वेणूचा भाग असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज नवीन टीव्हीएस रॅडियन सादर केली आहे. ही बाईक एका नव्या आणि आकर्षक (डायनॅमिक) डिझाइनसह आली आहे. ११ लाखांहून अधिक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टीव्हीएस रॅडियन या बाईकची नवीन आवृत्ती, तिच्या आधीच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेला कायम राखत, एक आधुनिक आणि ग्राहकांच्या आकांक्षांना साजेसे असे नवीन डिझाइन सादर करते.

गेल्या काही वर्षात, बदलत्या भारतासोबतच टीव्हीएस रॅडियनचे ग्राहकही प्रगत झाले आहेत. वाढत्या आकांक्षा, बदलती जीवनशैली आणि नवनवीन अनुभवांचा वाढलेला सहवास यामुळे दैनंदिन प्रवासाच्या साधनांबाबतच्या अपेक्षांमध्येही बदल झाला आहे. हा बदल लक्षात घेऊनच नवीन टीव्हीएस रॅडियनची रचना करण्यात आली आहे. यात एक वैशिष्ट्यपूर्ण नवीन लूक (दृश्य ओळख) आणि त्यासोबतच टीव्हीएस रॅडियनची ओळख असलेली मजबूती, उपयुक्तता आणि  दैनंदिन वापरासाठीची अष्टपैलू क्षमता यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.

एक वैशिष्ट्यपूर्ण नवीन डिझाइन लँग्वेज

टीव्हीएस रॅडियन एक नवीन, ताजेतवाने डिझाइन सादर करते, ज्यामध्ये फ्युएल टँक, साईड पॅनल आणि रिअर काउलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ठळक आणि दिशादर्शक डिझाइनमुळे मोटरसायकलला रस्त्यावर एक आधुनिक आणि आत्मविश्वासपूर्ण अस्तित्व प्राप्त होते, त्याच वेळी तिचा सहजसुंदर स्वभावही कायम राहतो.

पुढच्या बाजूला, वैशिष्ट्यपूर्ण सिग्नेचर लाईट असलेला नवीन पिढीचा फुल LED हेडलॅम्प गती आणि गतिशीलतेची भावना निर्माण करतो. हेडलॅम्पला पूरक असे अखंडपणे जोडलेले LED टर्न सिग्नल लॅम्प मोटरसायकलच्या आकर्षक दिसण्यात आणि आधुनिकतेत भर घालतात. मागील बाजूस सिग्नेचर घटक आणि 3D टनेल इफेक्ट असलेला नवीन LED टेल लॅम्प आहे, जो अधिक खोली आणि मागच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करतो. LED टर्न सिग्नल लॅम्प एक स्वच्छ आणि अत्याधुनिक फिनिशसह हा लूक पूर्ण करतात.

नवीन डायनॅमिक ग्राफिक्स या ताज्या डिझाइनला आणखी आकर्षक बनवतात, ज्यामुळे मोटरसायकलमध्ये दृश्यात्मक ऊर्जा वाढते आणि तिचा तारुण्याने सळसळलेला महत्त्वाकांक्षी स्वभाव अधिक दृढ होतो.

दैनंदिन वापरासाठीची उपयुक्तता कायम

नवीन टीव्हीएस रॅडियनच्या डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली असली, तरीही या दुचाकीला एक विश्वासार्ह वाहन बनवणारी वैशिष्ट्ये आणि गुणधर्म यात कायम ठेवण्यात आले आहेत. या श्रेणीतील सर्वात लांब सीटची सुविधा यात मिळते आहे, जी दैनंदिन प्रवासात अधिक आरामदायी अनुभव देण्यासाठी डिझाइन केली गेली आहे; तसेच, RTMi सह येणारा रिव्हर्स एलसीडी क्लस्टर (reverse LCD cluster) चालकाला उपयुक्त माहिती आणि सोय उपलब्ध करून देतो.

या लॉन्चवर भाष्य करताना, टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष — कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय प्रमुख आणि कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख, अनिरुद्ध हलदार म्हणाले, “गेल्या दशकात, प्रगतीशील भारतासोबत टीव्हीएस रेडिऑनच्या ग्राहक संख्येत भर पडली आहे. 11 लाखांहून अधिक ग्राहकांनी टीव्हीएस रेडिऑनला त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनवले आहे आणि जसजशी त्यांची जीवनशैली, आकांक्षा आणि अपेक्षा विकसित झाल्या, तसतशी त्यांची मोटरसायकलही त्यांच्यासोबत विकसित झाली आहे. टीव्हीएस मोटरमध्ये, आम्ही नेहमीच ग्राहकाला अर्थपूर्ण उत्पादन विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. नवीन टीव्हीएस रेडिऑन हे त्याच विश्वासाचे प्रतिबिंब आहे, जे आजच्या नव्या भारतातील ग्राहकांच्या अनुषंगाने मोटरसायकलला अधिक तरुण, गतिमान आणि महत्त्वाकांक्षी स्वरूप देते. रेडिऑन उत्कृष्ट बिल्ड क्वालिटी, विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते आणि तिची विशिष्ट नवीन लाइटिंग सिग्नेचर, समकालीन ग्राफिक्स आणि आत्मविश्वासपूर्ण डिझाइन तिला एक पसंतीची राइड बनवते. नवीन टीव्हीएस रेडिऑन अशा ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे, ज्यांना त्यांची दैनंदिन मोटरसायकल, ते घडवत असलेल्या जीवनाप्रमाणे आणि देशाप्रमाणेच प्रगतीशील आणि अभिव्यक्त असावी असे वाटते. प्रोग्रेसिव्ह रेडिऑन रायडरच्या राष्ट्र उभारणीच्या भावनेला आम्ही सलाम करतो.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 12, 2026

October 12, 2026

October 12, 2026