हॉटेलमधील ‘पनीर’ खरेच पनीर आहे का? चीज ॲनालॉगवर प्रशासनाचा मोठा इशारा

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 21, 2026 6:14 AM

Google News
Follow Us

हॉटेलमधील ‘पनीर’ खरेच पनीर आहे का? चीज ॲनालॉगवर प्रशासनाचा मोठा इशारा

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अनेक ठिकाणी पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ वापरले जात असल्याचे प्रकार समोर आले असून, यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच आहेत. अनेक ठिकाणी जुने तेल वापरून पदार्थ तळले जातात, तर काही ठिकाणी केवळ चव टिकवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे घटक वापरले जातात. ग्राहक मात्र चवीवर भर देत असल्याने अशा प्रकारांना खतपाणी मिळते.

दरम्यान, पनीर डिश ऑर्डर करताना ते खरेच दुधापासून बनवलेले पनीर आहे का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. कारण पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरून पदार्थ तयार केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पनीर हे पूर्णपणे दुधापासून तयार होते, तर चीज ॲनालॉग हे वनस्पतीजन्य तेल, स्टार्च आणि इतर कृत्रिम घटकांपासून बनवले जाते.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांनी त्यांच्या मेनूकार्ड व बिलावर “चीज/पनीर ॲनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच, उत्पादक आणि पुरवठादारांनीही त्यांच्या उत्पादनांवर योग्य लेबलिंग करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनीही पदार्थ खरेदी करताना ‘ॲनालॉग’चा उल्लेख आहे का, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे. वाढत्या तक्रारींनंतर संबंधित विभागांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी कडक नियम लागू करण्यात येत आहेत.

ग्राहकांनी जागरूक राहून संशयास्पद प्रकार तात्काळ प्रशासनाकडे नोंदवावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026

April 16, 2026