बडवायझर 0.0 ने मुंबई इंडियन्ससोबत पहिल्या भागीदारीची घोषणा केली…

By: Abhi

On: Wednesday, April 1, 2026 1:39 PM

बडवायझर
Google News
Follow Us
  • या भागीदारीत टीम-इन्स्पायर्ड लिमिटेड एडिशन मर्चेंडाइजचा समावेश असून, बडवायझर 0.0 चा “फॅन-फर्स्ट” दृष्टिकोन अधिक मजबूत होणार आहे..
  • ब्रँडच्या “इन द हँड्स ऑफ फॅन्स” प्लॅटफॉर्मवर आधारित ही भागीदारी, टीम प्राइड, लॉयल्टी आणि फॅन कल्चरचा उत्सव साजरा करणार आहे.

बडवायझर 0.0 ने आज भारतातील सर्वात मोठ्या टी20 क्रिकेट लीगमधील अग्रगण्य फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससोबत भागीदारीची घोषणा केली. ही भागीदारी बडवायझर 0.0 चा 19व्या सीझनमधील पहिला प्रवेश असून, भारतातील क्रिकेट प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या सहयोगातून बडवायझर 0.0 मुंबईतील चाहत्यांशी जोडणार आहे, स्थानिक क्रिकेट संस्कृतीतील अभिमान, परंपरा आणि मॅच-डे रिवाज साजरे करणार आहे. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्टिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या या लीगमुळे चाहत्यांशी नातं अधिक घट्ट करण्याची संधी मिळणार आहे.

घोषणेवर प्रतिक्रिया देताना एबी इनबेव इंडिया चे व्हाइस प्रेसिडेंट, मार्केटिंग & ट्रेड मार्केटिंग, विनीत शर्मा म्हणाले “क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रभावी सांस्कृतिक कनेक्टर आहे आणि आमची आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पहिली भागीदारी चाहत्यांच्या उत्कटतेचं पुन्हा एकदा दर्शन घडवते. बडवायझर 0.0 मध्ये आम्ही स्वतःला संस्कृतीच्या अग्रभागी मानतो – फॅन एक्सप्रेशनला नवे ट्रेंड देतो, तरुण भारत खेळाशी कसा जोडतो हे ठरवतो आणि आजच्या काळात तो कसा दिसतो याचा टोन सेट करतो.

देशातील सर्वात मोठ्या टी20 क्रिकेट लीगमध्ये प्रवेश हा आमच्या प्रवासातील एक ठरवून घेतलेला टप्पा आहे – राष्ट्रीय फॅन्डमपासून शहराच्या फॅन्डमकडे जाणारा. मुंबई इंडियन्ससोबतच्या भागीदारीतून आम्ही भारतीय क्रिकेट फॅन्डममधील अभिमान, परंपरा आणि ऊर्जा साजरी करू, तसेच चाहत्यांना खेळाच्या केंद्रस्थानी ठेवणारे अनुभव निर्माण करू.”

मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलेमुंबई इंडियन्समध्ये आमचे चाहते हे आमच्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी आहेत. बडवायझर 0.0 सोबतची ही भागीदारी त्या सामायिक भावनेचा उत्सव आहे. त्यांचा ‘इन द हँड्स ऑफ फॅन्स’ प्लॅटफॉर्म आमच्या #OneFamily च्या उत्कटता, अभिमान आणि निष्ठेचं सुंदर प्रतिबिंब आहे. आम्ही एकत्रितपणे चाहत्यांसाठी संस्मरणीय, फॅन-फर्स्ट अनुभव निर्माण करू आणि त्यांना खेळाशी आणखी जवळ आणू – नव्या, सांस्कृतिकदृष्ट्या सुसंगत पद्धतींनी.”

ही भागीदारी बडवायझर 0.0 च्या सुरू असलेल्या “इन द हँड्स ऑफ फॅन्स” कॅम्पेनवर आधारित आहे. राष्ट्रीय स्तरावरील सामायिक क्षणापासून शहराच्या पातळीवरील उत्कटता आणि टीमप्रती असलेली निष्ठा याकडे लक्ष केंद्रित करत ही मोहिम पुढे नेली जात आहे. या टीम भागीदारीतून बडवायझर 0.0 दाखवणार आहे की चाहते आपल्या टीमची ओळख कशी घडवतात आणि खेळाचा आत्मा मैदानावर तसेच मैदानाबाहेर कसा जिवंत करतात. या सीझनमधील पहिल्या प्रवेशाचा भाग म्हणून बडवायझर 0.0 टीम-इन्स्पायर्ड लिमिटेड एडिशन मर्चेंडाइज लॉन्च करणार आहे. यामुळे चाहत्यांना त्यांच्या टीमप्रती असलेली निष्ठा दाखवण्याचा आणि सीझनचा भाग होण्याचा ठोस मार्ग मिळेल.

या पावलाने ब्रँड भारतीय क्रिकेटमधील आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे, फॅन-लेड स्टोरीटेलिंग आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अनुभवांवर भर देत आहे.

Abhi

Abhi quietly focused, effortlessly real. Building his own path, one step at a time. ✨
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 1, 2026

April 1, 2026

April 1, 2026

April 1, 2026

Jalna Accident

April 1, 2026

मणिपाल हॉस्पिटल Sahyadri Hospital

April 1, 2026