IPL 2026 : धोनीच्या चाहत्यांना धक्का! सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार; पुनरागमनावरही प्रश्नचिन्ह

By: Editor_Manas

On: Sunday, March 29, 2026 1:33 PM

Google News
Follow Us

पुणे | प्रतिनिधी – मानस : महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धोनी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या पुनरागमनाबाबतही आता अनिश्चितता निर्माण झाली आहे.

दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मोठा धक्का ठरलेल्या या घडामोडीत, धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहे. सुरुवातीला दोन आठवड्यांत तो फिट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता त्याच्या पूर्ण फिटनेससाठी तीन आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

यामुळे धोनी एप्रिल अखेरपर्यंत संघाबाहेर राहण्याची शक्यता असून, साखळी फेरीतील किमान ५ ते ६ सामने तो गमावू शकतो.

पहिल्या सामन्यातही अनुपस्थिती

चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. संघ सामना खेळण्यासाठी रवाना झाला असला, तरी धोनी अद्याप चेन्नईतच उपचार घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो डगआऊटमध्येही दिसणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CSK पहिल्यांदाच ‘धोनी-रैना’शिवाय

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सचा संघ धोनी आणि सुरेश रैना या दोघांशिवाय मैदानात उतरणार आहे. गेल्या १६ हंगामांत असे कधीच घडले नव्हते. रैनाने निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी कायम प्लेइंग इलेव्हनचा भाग राहिला होता.

नेतृत्वाची जबाबदारी गायकवाडवर

धोनीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे असणार आहे. तसेच यष्टिरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संघासाठी मोठे आव्हान

धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने 2021 मध्ये जेतेपद पटकावले होते. मात्र, त्यानंतरच्या काही हंगामांमध्ये संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही. मागील हंगामात तर संघ तळाशी राहिला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात संघावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now