अनिल मंद्रूपकर यांना ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’

By: Editor_Manas

On: Thursday, March 26, 2026 7:21 PM

Google News
Follow Us

पुणे : सामाजिक कार्यकर्ते लायन अनिल मंद्रूपकर यांना देशभरातील सहा राज्यांमध्ये ४७ वर्षे केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रांतील ५० जणांना यावेळी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रकवी दिवंगत रामधारी सिंह ‘दिनकर’ स्मृती न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार स्थापित करण्यात आला आहे.

मंद्रूपकर यांनी १९७९ मध्ये गुजरातमधील मोरबी पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर युवक बिरादरी, लायन्स इंटरनॅशनल, वनराई, डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये फाउंडेशन, एकलव्य, आशीर्वाद वृद्धाश्रम, स्नेहक्षितिज मेंटल रिहॅबलिटेशन, लेकटाऊन सोसायटी, विश्वेश्वर एम्पॉवरमेंट विविध सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केले. 

कमिन्स इंडियामध्ये चार दशकांच्या कार्यकाळातही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी २००६ मध्ये पुण्यात ‘इको फ्रेंड्स’ लायन्स क्लबची स्थापना केली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात शौचालय उभारणी, स्वच्छता मोहिमा तसेच ‘३आर’ तत्त्वांवर आधारित उपक्रम राबविले. आर्वी गावात उभारलेल्या शौचालय प्रकल्पासाठी राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी मदत, विविध सामाजिक संस्थांना सहकार्य आणि सातत्यपूर्ण समाजकार्य ही त्यांची ओळख ठरली आहे. मंद्रूपकर यांनी या सन्मानाबद्दल सर्व सहकारी, संस्था आणि मित्रांचे आभार मानत ‘विकसित भारत’साठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘हा सन्मान आजवर केलेल्या कार्याचा गौरव आणि यापुढेही आणखी जोमाने काम करण्यासाठी मिळालेली प्रेरणा असल्याची भावना मंद्रुपकर यांनी व्यक्त केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 26, 2026

March 26, 2026

March 26, 2026

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026