विमानशास्त्राची रोमांचक सफर घडवणारे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शन २७, २८ रोजी

By: Editor_Manas

On: Thursday, March 26, 2026 7:18 PM

Google News
Follow Us

पुणे : विमानशास्त्राविषयी सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासोबतच उड्डाणाच्या विज्ञानाची सखोल ओळख करून देणारे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ हे अनोखे प्रदर्शन २७ व २८ मार्च २०२६ या दोन दिवशी पाषाण येथील अरोमी येथे होणार आहे. एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे आणि प्रसिद्ध एरो मॉडेलर माधव खरे यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनासाठी प्रवेश मोफत असून, नोंदणी अनिवार्य आहे.

‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनातून प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंतच्या उड्डाण यंत्रांच्या विकासाची सविस्तर आणि चित्रमय कथा उलगडणार आहे. १९९९ साली विज्ञान व तंत्रज्ञान विभागासाठी तयार करण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये विमानशास्त्राच्या विविध टप्प्यांमागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि विज्ञानप्रेमी यांच्यासाठी हे प्रदर्शन एक ज्ञानमय पर्वणी ठरणार आहे.

उडणाऱ्या मॉडेल्सची थेट प्रात्यक्षिके, घरातील तसेच मैदानी वापरासाठी तयार करण्यात आलेल्या विविध फ्लाइंग मॉडेल्सद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा संगम प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. याशिवाय भारतात तयार केलेली फ्लाइंग मॉडेल्स किफायतशीर दरात खरेदी करण्याची संधीही येथे उपलब्ध आहे.

तसेच, इच्छुकांसाठी वॉक-इन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, सहभागी स्वतःचे उडणारे मॉडेल तयार करून विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. शाळांसाठी विशेष दुपारच्या वेळापत्रकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना गर्दी टाळून प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. विज्ञान आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असलेली ही संधी पुणेकरांनी साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 26, 2026

March 26, 2026

March 26, 2026

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026