यूपीआय व्यवहारांसाठी अँड्रॉइड आणि आयओएसवर भीम पेमेंट्स ॲपचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन

By: Editor_Manas

On: Tuesday, March 24, 2026 3:52 PM

Google News
Follow Us

मुंबई, 24 मार्च 2026: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NPCI) पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनपीएसआय भीम सर्व्हिसेस लि.ने (NBSL) ‘BHIM’ पेमेंट ॲपवर यूपीआय व्यवहारांसाठी ‘बायोमेट्रिक प्रमाणीकरण’ सुविधा सुरू केल्याची घोषणा आज केली. या नवीन वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवरील फिंगरप्रिंट किंवा फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून, ५,००० रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार मंजूर करणे शक्य होईल; ज्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होतील. ही सुविधा सध्या अशा iOS आणि Android डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहे, जे फिंगरप्रिंट आणि फेशियल रिकग्निशनची सुविधा देतात.

या नवीन सुविधेमुळे, भीमच्या ग्राहकांना आता प्रत्येक पेमेंटसाठी आपला यूपीआय पिन टाकण्याची गरज नाही. त्याशिवायही हे व्यवहार करता येतील. अनेकदा ग्राहक आपला पिन नंबर विसरतात किंवा तो चुकीचा टाकतात, त्यामुळे अनेकदा पेमेंट अयशस्वी ठरते, अशा वेळी ही सुविधा उपयुक्त ठरते; यामुळे व्यवहार  अधिक सुलभ आणि विश्वासार्ह होतात. मित्र आणि कुटुंबीयांना पैसे पाठवणे, व्यापाऱ्यांना क्यूआर कोडद्वारे पेमेंट करणे आणि ऑनलाइन व्यवहार यांसारख्या दैनंदिन व्यवहारांच्या विविध प्रसंगी ही सुविधा वापरता येते; यामुळे डिजिटल पेमेंट्सचा वापर अधिक सहज आणि सोपा होतो.

एनबीएसएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, ललिता नटराज म्हणाल्या, “प्रत्येक भारतीयासाठी डिजिटल पेमेंट सोपे, सुरक्षित आणि सुलभ बनवण्यावर भीम पेमेंट्स ॲपने नेहमीच लक्ष केंद्रित केले आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे, आम्ही दैनंदिन पेमेंट अधिक सुलभ करत आहोत आणि या व्यवहारांवरील विश्वास अधिक दृढ करत आहोत. ग्राहकांना त्यांचे फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकद्वारे व्यवहारांची पुष्टी करण्याची सुविधा देऊन, आम्ही पिन एंट्रीवर अवलंबून राहणे कमी करत आहोत. लाखो भारतीयांसाठी एक अखंड आणि विश्वासार्ह डिजिटल पेमेंट अनुभव निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे पेमेंट प्रक्रियेमध्ये एक अतिरिक्त सुरक्षा जोडली जाते. बोटांचे ठसे आणि फेशिअल रिकग्निशन हे प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वाचे  असतात आणि ते थेट संबंधित डिव्हाइसवरच सेव्ह केले जातात; यामुळे पेमेंट्स ग्राहकाच्या ओळखीशी जोडलेले राहते. पिन नंबर इतरांना कळणे किंवा चुकीचा टाकला जाणे, यासारखे धोके यामुळे कमी होतात. परिणामी, ग्राहक अधिक आत्मविश्वासाने व्यवहार करू शकतात. ₹5,000 पेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी मात्र यूपीआय पिन टाकणे यापुढेही आवश्यक राहील, ज्यामुळे मोठ्या रकमेच्या पेमेंट्सना सुरक्षेचे आणखी एक अतिरिक्त कवच मिळेल.

भीम पेमेंट्स ॲपवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण कसे सुरू करावे:

  1. भीम पेमेंट्स ॲप उघडा.
  2. प्रोफाइलमध्ये जा.
  3. तुमचे बँक खाते निवडा.
  4. बायोमेट्रिक व्यवहार सक्रिय करा.
  5. आता तुमच्या फिंगरप्रिंटचा वापर करून ₹5000 पर्यंतचे व्यवहार करा.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 24, 2026

March 24, 2026

March 24, 2026

March 24, 2026

March 24, 2026

March 24, 2026