ई-मोबिलिटीमध्ये ओबेन इलेक्ट्रिकची जोरदार कामगिरी

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:08 AM

Google News
Follow Us

पुणे, मार्च २०२६: ओबेन इलेक्ट्रिक ने जाहीर केले की ओबेन मोटारसायकलस्वारांनी कंपनीच्या देशव्यापी लाँचिंगनंतर केवळ दोन वर्षांत भारतीय रस्त्यांवर सामूहिकपणे ३.२ कोटींहून अधिक किलोमीटर अंतर पार केले आहे. ग्राहक आपल्या दैनंदिन प्रवासासाठी प्राथमिक साधन म्हणून ओबेन मोटारसायकलींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, हेच यावरून स्पष्ट होते.

२०२४ च्या सुरुवातीपासून विविध बाजारपेठांमधील वाहनांच्या डेटावरून एकत्रित केलेले हे अंतर, कंपनीच्या ‘रोर’ पोर्टफोलिओमधील रोर, रोर ईझेड आणि रोर ईझेड सिग्मा या मॉडेल्सचा ग्राहकांकडून होणारा सातत्यपूर्ण वापर दर्शवते. विविध शहरांमधील वाहतूक, भूप्रदेश आणि हवामानाच्या परिस्थितीत पार केलेले हे किलोमीटर प्रत्यक्ष प्रवासातील विश्वासार्हता अधोरेखित करतात. ग्राहक शहरी भागातील रस्ते आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या दैनंदिन प्रवासासाठी ओबेन मोटारसायकलींना पसंती देत असल्याचे यावरून दिसून येते.

८५ हून अधिक शहरांमधील वाढत्या उपस्थितीमुळे, पार केलेल्या किलोमीटरचे हे प्रमाण ओबेन इलेक्ट्रिकच्या विस्तारत असलेल्या ग्राहक बेसचा दैनंदिन वापर प्रतिबिंबित करते. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या राज्यांचा या प्रवासात मोठा वाटा आहे, जे प्रमुख शहरी बाजारपेठांमधील ओबेनची पकड आणि दैनंदिन प्रवासातील त्यांचे महत्त्व अधोरेखित करते.

या टप्प्यावर भाष्य करताना ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापीका आणि सीईओ, मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “दैनंदिन प्रवासासाठी सातत्य, विश्वासार्हता आणि मालकीचा आत्मविश्वास असणे आवश्यक असते. विविध शहरांमध्ये आणि विविध परिस्थितीत रायडर्सनी ओबेन मोटारसायकलवर ३.२ कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार करणे हे ग्राहक या मोटारसायकलींना त्यांच्या रोजच्या प्रवासाचा अविभाज्य भाग कसे बनवत आहेत, याचेच प्रतिबिंब आहे. यामुळे भारतीय प्रवासाच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने विकसित करण्याच्या आमच्या उद्देशाला अधिक बळकटी मिळते.”

ओबेन इलेक्ट्रिकच्या जबरदस्त विकास प्रक्रियेदरम्यान हा मैलाचा दगड गाठला गेला आहे. कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये, विस्तारती बाजारपेठ आणि ग्राहकांकडून वाढता प्रतिसाद यामुळे कंपनीने ३७६% वार्षिक वाढ नोंदवली आहे. कंपनी भारतात आपले रिटेल नेटवर्क सातत्याने मजबूत करत असून, येत्या दोन वर्षांत ५०० शोरूम्सपर्यंत विस्तार करण्याची त्यांची योजना आहे, ज्यामुळे त्यांच्या मोटारसायकली आणि सेवा परिसंस्था ग्राहकांसाठी अधिक सुलभ होईल.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026