BIG NEWS : पिंपरी-चिंचवडमधील स्पा ‘सिंडिकेट’चे धाबे दणाणले! पडद्यामागचे सूत्रधार आता सरकारच्या रडारवर

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 18, 2026 4:03 PM

Google News
Follow Us

BIG NEWS : पिंपरी-चिंचवडमधील स्पा ‘सिंडिकेट’चे धाबे दणाणले! पडद्यामागचे सूत्रधार आता सरकारच्या रडारवर

मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड : राज्यातील महानगरांमध्ये, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या शैक्षणिक व आयटी हबमध्ये ‘स्पा आणि वेलनेस सेंटर्स’च्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापार आणि मानवी तस्करीचा मुद्दा आज विधान परिषदेत गाजला. आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना, स्पा व्यवसायासाठी पुढील ३ ते ४ महिन्यांत स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

सभागृहात बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, महाराष्ट्र हे विद्येचे माहेरघर आहे, मात्र आज पुण्यासारख्या शहरांत शिक्षणासाठी येणारी तरुण पिढी स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकारांत बरबाद होत आहे. हे केवळ स्पा नसून अमली पदार्थ आणि मानव तस्करीचे अड्डे बनले आहेत. पोलीस कारवाई करतात, पण दोन दिवसांत तेच मालक नव्या नावाने सेंटर सुरू करतात. विमाननगरमधील पीडित महिलेचा मृत्यू ही देखील गंभीर घटना आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नायडू, पटेल, शेख, फकीर, अधिकारी, बांदोडकर अशा अनेक ठराविक लोकांची एक संघटित साखळी हा काळा बाजार चालवत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार गोरखे यांनी केला. केवळ कर्मचाऱ्यांवर गुन्हे न नोंदवता, या ‘मास्टरमाइंड्स’च्या मालमत्तांची चौकशी करून त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कठोर कारवाई करावी, स्पा व्यवसायासाठी ‘शॉप ॲक्ट’ ऐवजी स्वतंत्र नियमावलीची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी केली.

आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा अहवाल लवकरच सादर होईल. पुढील ३-४ महिन्यांत स्पा सेंटरसाठी कडक निकष असलेली नवीन नियमावली लागू केली जाईल. तसेच, जे एजंट महिलांना अशा दलदलीत ढकलतात, त्यांच्यावर मुळापासून कारवाई केली जाईल आणि गरज पडल्यास ‘मकोका’ लावण्याबाबतही शासन सकारात्मक विचार करेल.

यावेळी आमदार चित्राताई वाघ यांनी देखील अमित गोरखे यांच्या मागणीला जोरकस पाठिंबा देत महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 18, 2026

March 18, 2026

March 18, 2026

March 18, 2026

March 17, 2026

March 17, 2026