अहिल्यानगरमध्ये खळबळ! पैशासाठी सासऱ्याचा खून ; प्रेयसीलाही संपवले; डिझेल ओतून मृतदेह जाळला; ‘प्रेयसीचा धक्कादायक शेवट’

By: Editor_Pratik

On: Sunday, March 15, 2026 5:22 AM

Google News
Follow Us

अहिल्यानगर : शेतजमिनीच्या पैशांच्या लोभापोटी सासऱ्याचा निघृण खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या धक्कादायक प्रकरणात जावई, मुलगा आणि सून हेच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपीने आपल्या प्रेयसीचाही खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याची धक्कादायक कबुली दिल्याने दुहेरी खून प्रकरण उघडकीस आले आहे.

गॅस टंचाई वाढली; शैक्षणिक संस्थांना १००%, इतरांना मर्यादित पुरवठा

चिंचोली रमजान (ता. कर्जत) येथील बापू आनंदा गाढवे (वय ६०) हे ५ मार्चपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा आकाश बापू गाढवे (वय २६) याने मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. बेपत्ता व्यक्तीचा शोध लागत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपक मेढे, अंमलदार फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनील मालवणकर, प्रशांत राठोड, सतीष भवर, किरण ठुबे, सुवर्णा गोडसे, भगवान धुळे यांचे पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.

LPG सिलेंडरवर बंदी; पेट्रोलियम मंत्रालयाचा नवा निर्णय

तपासादरम्यान नातेवाईकांकडे चौकशी करताना तक्रारदार आकाश गाढवे याच्यावरच संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या प्रकरणाचा धक्कादायक गुन्हेगारी कट उघड झाला. तपासादरम्यान सुनील रामदास राठोड (वय ३७, रा. पातुर, जि. अकोला, हल्ली रा. आंबेठाण रस्ता, चाकण, पुणे) शेगावजवळील खळवाडी येथे मित्राच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत राठोड याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, आकाश गाढवे, त्याची पत्नी पायल उर्फ आकांक्षा गाढवे (दोघे रा. रमजान चिंचोली) तसेच प्रथमेश उर्फ भावेश चांदुरकर आणि अमोल भिकाजी लाटकर (दोघे रा. पुनोती, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांच्या संगनमताने हा कट रचण्यात आला होता.

‘डिझेल ओतून मृतदेह जाळला’

गाढवे कुटुंबातील शेतजमीन विकून पैसे मिळवायचे होते. मात्र बापू गाढवे जमीन विकण्यास तयार नव्हते. त्यामुळे ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी त्यांच्या घरातच कट रचून त्यांचा खून करण्यात आला. संशयित आरोपींनी बापू गाढवे यांच्या तोंडावर उशी दाबून गळा आवळला आणि त्यांचा जीव घेतला. त्यानंतर घराजवळ लाकडे गोळा करून डिझेल ओतून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बापू गाढवे खून प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘प्रेयसीचा धक्कादायक शेवट’

दरम्यान, चौकशीत आणखी एक खळबळजनक गुन्हा समोर आला. संशयित आरोपी सुनील राठोड याचे शितल लिंबाजी सोंगेवाड (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) हिच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र ती त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. त्यामुळे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचा खून करून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील धनेगाव परिसरात मृतदेह अर्धवट जाळून टाकल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now