वाघोलीत १८ ते २२ मार्चदरम्यान ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी

By: Editor_Manas

On: Saturday, March 14, 2026 4:47 AM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेची सुरुवात केली होती. राज्यातील कुस्तीपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी हा या स्पर्धेचा उद्देश होता. गेली ६७ वर्षे सातत्याने आयोजित होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा ६८वे अधिवेशन पार पडत आहे.

ही स्पर्धा स्व. अजितदादा पवार क्रीडानगरी, बाजार मैदान, वाघोली येथे होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते होणार असून २२ मार्च रोजी समारोप सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी, तर उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला स्कॉर्पिओ N गाडी देण्यात येणार आहे. याशिवाय माती व गादी विभागातील सुवर्णपदक विजेत्यांना एकूण १८ बुलेट मोटारसायकली, तर रौप्यपदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटारसायकल देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी मातीचे दोन आणि मॅटचे दोन असे चार आखाडे उभारण्यात येणार आहेत. राज्यातील ४२ जिल्हा कुस्ती संघांमधून सुमारे १५०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांसाठी ३५ ते ४० हजार क्षमतेचे भव्य स्टेडियम उभारण्यात येत असून मोठ्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

याशिवाय तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट रिल्स बनवणाऱ्यास आयफोन, उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी कॅमेरा लेन्स, तर उत्कृष्ट रॅप सॉंगसाठी १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

या मानाच्या ऐतिहासिक स्पर्धेला महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांनी केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026