आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनी Media Expo Mumbai 2026 मध्ये १४० हून अधिक प्रदर्शक

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 4:16 PM

Google News
Follow Us

मुंबई, मार्च २०२६: इनडोअर आणि आऊटडोअर जाहिरात तसेच साईनेज सोल्यूशन्ससाठीची आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनी Media Expo Mumbai 2026 ची ५७ वी आवृत्ती ९ ते ११ एप्रिलदरम्यान बॉंबे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात जागतिक आघाडीच्या ब्रँड्स आणि सर्जनशील व्यावसायिकांना एकत्र आणत भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले जाणार आहे.  मागील आवृत्त्यांच्या यशावर आधारित या वर्षीच्या प्रदर्शनात डिजिटल साईनेज तसेच पीओपी / पीओएसएम सोल्यूशन्सवर अधिक भर देण्यात येणार आहे. रिटेल, ब्रँडिंग आणि आउट-ऑफ-होम (ओओएच) माध्यमांमध्ये तंत्रज्ञानाधारित दृश्य संवादाची वाढती गरज लक्षात घेऊन ही दिशा निश्चित करण्यात आली आहे.

उद्योगातील वाढत्या डिजिटल विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बिलबोर्ड आणि आऊटडोअर जाहिरात क्षेत्रानेही भक्कम वाढ नोंदवली आहे. ग्रॅण्ड व्ह्यू रिसर्चच्या अहवालानुसार, भारतातील बिलबोर्ड आणि आऊटडोअर जाहिरात बाजाराने २०२५ मध्ये ५७६.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतका महसूल निर्माण केला असून, २०३३ पर्यंत हा आकडा १०७५.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हा बाजार सुमारे ८.२ टक्के वार्षिक दराने वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः इमारत-आधारित जाहिरात हा विभाग सर्वाधिक महसूल निर्माण करणारा आणि जलद वाढणारा विभाग ठरला आहे. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढत्या सहभागामुळे Media Expo Mumbai 2026 चे महत्त्व अधिक वाढले आहे.

मेसे फ्रँकफुर्ट एशिया होल्डिंग्स लि. चे कार्यकारी संचालक व बोर्ड सदस्य राज मानेक म्हणाले की, Media Expo Mumbai 2026 हा उद्योगासाठी नव्या संधींच्या उंबरठ्यावर उभा आहे. साईनेज क्षेत्राने डिजिटल परिवर्तन स्वीकारले असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतींकडेही वळण घेतले आहे. प्रगत डिजिटल साईनेजपासून ते नाविन्यपूर्ण इन्टिरिअर-एक्स्टिरिअर डेकोर फॉरमॅट्सपर्यंत साईनेज आणि ओओएच मीडिया परिसंस्थेचा प्रभाव व उपयोगक्षेत्र सातत्याने वाढत आहे.”

सुमारे १५,००० चौ. मी. एरियात आयोजित या प्रदर्शनात १४० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार असून सुमारे २५० पेक्षा जास्त ब्रँड्सचे ३५० हून अधिक उत्पादने प्रदर्शित केली जाणार आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026