स्माईल फाउंडेशन आणि बर्जर पेंट्सचा कौशल्य विकास उपक्रमाचा विस्तार

By: Editor_Manas

On: Tuesday, November 17, 2026 3:49 PM

Google News
Follow Us

पुणे, नोव्हेंबर : घरगुती रंगकाम करणाऱ्या कामगारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्माईल फाउंडेशन आणि बर्जर पेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘आयट्रेन ऑन व्हील्स’ या कौशल्य विकास उपक्रमाचा पुणे आणि परिसरात विस्तार करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे कामगारांना त्यांच्या परिसरातच मोफत तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.

गेल्या चार वर्षांत देशभरातील ५.४८ लाख रंगकाम करणाऱ्या कामगारांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. देशातील २७ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील ४१२ जिल्ह्यांत २७ फिरती प्रशिक्षण वाहने कार्यरत आहेत. प्रशिक्षणामुळे कामगारांच्या उत्पन्नात अंदाजे ६० ते ७० टक्क्यांनी वाढ झाल्याचे क्षेत्रीय निरीक्षणांतून समोर आले आहे.

पुण्यात आतापर्यंत ८६१ प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली असून, २४ हजार २५२ कामगारांनी प्रशिक्षण घेतले आहे. आता हिंजवडी, मान, मारुंजी, वाकड, शेवाळेवाडी, खराडी, लोहगाव आणि वाघोली या भागांत उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दुसरा प्रशिक्षण प्रकल्प नागपूर येथे तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणात अंतर्गत व बाह्य रंगकाम, वॉटरप्रूफिंग, टेक्स्चर पेंटिंग, लाकडावरील रंगकाम, पृष्ठभागाची पूर्वतयारी, आधुनिक रंगकाम पद्धती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा समावेश आहे. सैद्धांतिक मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कामाचा दर्जा सुधारण्याबरोबरच कामगारांना अधिक उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

स्माईल फाउंडेशनचे सहसंस्थापक संतनू मिश्रा म्हणाले, कौशल्य विकासाच्या माध्यमातून कामगारांना चांगल्या रोजगाराच्या संधी आणि आर्थिक प्रगती साधण्यास मदत होत आहे.

बर्जर पेंट्सचे वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक एन. आय. जोसेफ यांनी आधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कामगारांना अद्ययावत प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

भारतातील पेंट उद्योगाची बाजारपेठ २०२५ मध्ये सुमारे ९३ हजार ९४ कोटी रुपये होती. २०३० पर्यंत ती एक लाख ४५ हजार ७८२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 17, 2026

November 17, 2026

November 17, 2026

November 15, 2026

November 15, 2026

November 15, 2026