‘रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट’च्या डीआरआरएनपदी ॲड. सत्यजित कराळे पाटील यांची निवड

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 4:02 PM

Google News
Follow Us

पुणे : रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह नॉमिनी (डीआरआरएन) या पदावर ॲड. सत्यजित शिवाजीराव कराळे पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने युवक नेतृत्व आणि सेवा उपक्रमांना त्यांच्या कार्यकाळात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. व्यवसायाने वकील असलेले कराळे पाटील यांनी फौजदारी, सायबर तसेच एनडीपीएस कायद्यात विशेष प्राविण्य मिळविले आहे. व्यावसायिक कामकाजाबरोबरच सामाजिक कार्य आणि युवक नेतृत्व घडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

कराळे पाटील यांनी २०१५ साली रोटरॅक्ट क्लब ऑफ मराठवाडा मित्र मंडळ, पुणे कोथरूड या क्लबचे चार्टर मेंबर म्हणून रोटरॅक्टमध्ये प्रवेश केला. सेवाभावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढील दशकभरात विविध नेतृत्वाच्या जबाबदाऱ्यांमधून अधिक व्यापक झाला. रोटरॅक्टमधील कार्यकाळात त्यांनी क्लबपासून जिल्हास्तरापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. २०१९–२० या वर्षात क्लबचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या नेतृत्वाखाली १३७ हून अधिक सेवा प्रकल्प राबविण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यांनी राबविलेल्या ‘प्रोजेक्ट न्याय संहिता’ या उपक्रमालाही विशेष प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश असून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या सहकार्याने विविध समुदायांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचविण्याचे काम करण्यात आले आहे. रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील सेवा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी तसेच युवक नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026