BIG NEWS : मुंबईत बॉम्ब-मिसाईल धमकीचा मेल; विधानभवनासह चार ठिकाणांवर सुरक्षा वाढवली

By: Editor_Pratik

On: Thursday, March 12, 2026 5:20 AM

Google News
Follow Us

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या ई-मेलमध्ये विधिमंडळासह मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करत सुरक्षा व्यवस्था कडक केली.

सकाळी साधारण ६ वाजून ५७ मिनिटांनी सीपीएच्या मेलवर ही धमकी आली होती. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर थांबवण्यात आले. नंतर ओळखपत्रांची तपासणी आणि सुरक्षा पाहणी केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला.

या संदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने बॉम्ब आणि मिसाईलच्या धमकीचा मेल गंभीरतेने घेतला गेला आहे. बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण परिसराची सखोल तपासणी सुरू केली असून पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

धमकीच्या मेलमध्ये विधिमंडळ, मुंबई मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, उच्च न्यायालय आणि एका बँकेला लक्ष्य केल्याचा उल्लेख असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच जाहीर करण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार धमकी देणारा मेल खलिस्तानी समर्थकांशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेल आल्यानंतर तात्काळ गृह विभागाने सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून सर्व संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026