रुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी

By: Editor_Manas

On: Friday, March 6, 2026 3:18 PM

Google News
Follow Us

पुणे: तळागाळात काम करणाऱ्या, गरिबांची मदत करणाऱ्या, निस्वार्थी समाजसेवा करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा रुग्ण हक्क परिषद दरवर्षी शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरव करते. रुग्ण हक्क परिषदेचा हा शिवसन्मान पुरस्कार अनेकांना समाजकार्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असे मत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लालमहल येथे आयोजिलेल्या शिवसन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात भानुप्रताप बर्गे बोलत होते. प्रसंगी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, सह्याद्री हॉस्पिटलचे उपाध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भारत देसडला, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. हनुमंत चव्हाण, राजाभाऊ कदम, लहुजी शक्ती सेनेचे अमोल चव्हाण, गोविंद साठे आदी उपस्थित होते.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने या सोहळ्यात उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, राजकीय, विधी व न्याय तसेच क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०१ मान्यवरांचा लाल महल येथे शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानचिन्ह, पुस्तक, उपरणे आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यामध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कोषाध्यक्ष अनिल गुंजाळ, माजी शासकीय अधिकारी देवेंद्र दलाल, युवा पत्रकार राधिका वळसे पाटील, सज्जद सय्यद, अनिल खुडे, लक्ष्मण साबळे, दलित पॅंथरच्या प्रदेशाध्यक्ष स्नेहा माने, ह.भ.प. विष्णु महाराज चामनर, हरजीवन हॉस्पिटलचे डॉ. सागर रोकडे, आदर्श शिक्षिका राखी रासकर, गायिका शिल्पा पांचाळ, नगरसेवक निलेश आल्हाट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय भंडारे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे शासकीय अधिकारी शितल फत्तेपुरे, समर्थ सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज माळवदकर, तृतीयपंथी कार्यकर्त्या प्रीती लाटे, भाकर फाउंडेशन मुंबईचे ॲड. दीपक सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील १०१ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

उमेश चव्हाण म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आणि न्यायासाठी दिलेली प्रेरणा समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्याच विचारातून रुग्ण हक्क परिषद आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने काम करत आहे. समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्तींना शिवसन्मान पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा उद्देश असून, यामुळे समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळते.” समाजासाठी सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी, यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसन्मान पुरस्काराचे आयोजन रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित राजे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मंदार सावजी यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026