राज्यस्तरीय खेळाडू मुलाची धिंड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

By: Editor_Pratik

On: Wednesday, March 4, 2026 2:24 PM

Google News
Follow Us

सातारा : साताऱ्यातील म्हसवड येथील अल्पवयीन मुलाची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीय आणि समाजकार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

मुलाच्या पालकांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अल्पवयीन असून तो राज्यस्तरीय खेळाडू आहे. त्याची दोन वेळा राज्य पातळीवर निवड झाली असून १३ वेळा जिल्हा स्तरावर त्याने यश मिळवले आहे. मात्र दीड वर्षापूर्वी केवळ सोशल मीडियावर स्टेटस ठेवले म्हणून पोलिसांनी त्याला या प्रकरणात अडकवल्याचा आरोप त्यांनी केला.

“आमच्या मुलाची धिंड काढण्यात आली, त्यामुळे समाजात आमची बदनामी झाली. माझ्या मुलाने कुणाचा खून केला होता का? त्याच्यावर यापूर्वी कधीही कोणताही गुन्हा नव्हता,” असा संतप्त सवाल मुलाच्या आईने उपस्थित केला. या घटनेमुळे मुलाच्या आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात कारवाई झाली नाही तर उद्यापासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून घेत असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या आश्वासनाने कुटुंबीयांचे समाधान झालेले नाही.

म्हसवड येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अल्पवयीन मुलाची धिंड काढल्याचा आरोप होत असून, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तक्रारदार आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.

आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026