प्रकल्प प्रदर्शनातून होते विद्यार्थ्यांतील कलाकौशल्य, संघभावना विकसित

By: Editor_Manas

On: Sunday, March 1, 2026 8:07 AM

Google News
Follow Us

पुणे: “जापनीज संस्कृती, भारत-जपान मैत्रीचे प्रतीक ओकायामा उद्यान, आकर्षक व कलात्मक डिझाइन्स, त्याचे सादरीकरण अतिशय सुरेख पद्धतीने केले आहे. भवतालच्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती उभारून त्याचे प्रदर्शन चिथारण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य, संघभावना विकसित होते,” असे प्रतिपादन नामवंत आर्किटेक्ट आशिष सचदे यांनी केले. 

विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे, असे भैरवी सचदे यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण संरचना, चाकोरीबाहेरचा विचार आणि कलात्मकतेचा अंगीकार विद्यार्थ्यांनी करावा, अशी अपेक्षा आर्कि. निलय पारेख यांनी व्यक्त केली. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याला ‘सूर्यदत्त संस्थेने नेहमीच भर दिला असल्याचे ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) आयोजित ‘ऑरा २०२६’ सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. प्रदर्शनाचे हे २१ वे वर्ष असून, यंदा ‘जपानची संस्कृती’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे.

जपानी शैलीवर आधारित विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाने उपस्थितांना भुरळ घातली. फुलांची सजावट, सुमो प्रतिकृती आणि आकर्षक रंगसंगतीसोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेली संतुलित रचना, थ्रीडी मांडणी व डिझाइन शीट्स पाहून कौतुक केले. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या प्रदर्शनातून ठळकपणे दिसले. यासह प्रदर्शनामध्ये रेसिडेन्शियल इंटिरिअर, कमर्शिअल इंटिरिअर व त्यामध्ये सिंगल लाईन व्यवस्थ्येपासून फर्निचरपर्यंतची व्यवस्था, हॉस्पिटल डिजाईन, विविध विषय घेऊन रेस्टोरंट डिझाईन, शोरूम, गॅलरीजचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी निखिल प्राईड इमारतीत असलेल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीमध्ये हे प्रदर्शन १ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विनामूल्य खुले असणार आहे. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी वास्तव्य आर्किटेक्टचे आर्कि. निलय व निधी पारेख, युनिसन डिझाईन्सच्या आर्कि. भैरवी सचदे, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे, प्रा. मंदार दिवाणे, प्रा. पल्लवी पुरंदरे, प्रा. अनिकेत नायकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जापनीज शिष्टमंडळाने प्रदर्शनाला भेट दिल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

निधी व निलय पारेख यांनी विद्यार्थ्यांच्या या कलेचे कौतुक केले. प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यातून नाविन्यपूर्ण डिझाईन्स तयार होतात. एखादा प्रकल्प साकारताना सांघिक योगदानाचे महत्व त्यांना कळते. पाठ्यपुस्तकांतील ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले, तर व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करता येते, असे पारेख यांनी नमूद केले.

प्राचार्य अजित शिंदे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रा. अजित शिंदे म्हणाले, “सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या प्रदर्शनात दरवर्षी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येते. यंदा जपानी संस्कृतीवर आधारित हे प्रदर्शन असून, सर्व विद्यार्थ्यांनी एकजुटीने ते साकारले आहे. भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे दर्शन यानिमित्ताने विद्यार्थ्यांना झाले आहे.”

प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन पल्लवी पुरंदरे, अनिकेत नाईकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026