एसटी चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; सासवड आगारातील धक्कादायक प्रकार

By: Editor_Pratik

On: Saturday, February 28, 2026 4:39 PM

Google News
Follow Us

पुणे : Saswad येथील एसटी आगारात भरदुपारी एसटी चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून तीन तरुणांनी चालक सचिन नाळे यांना “आम्ही गावचे लोक आहोत” अशी दादागिरी करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आरोपींनी चालकाला अक्षरशः रक्त येईपर्यंत मारहाण केली. घटनेचे चित्रण मोबाईलमध्ये होत असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणांनी मोबाईल खाली पाडण्याचाही प्रयत्न केला. मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावलेल्या वाहकालाही मारहाण करण्यात आली.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून उर्वरित दोघे संशयित फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे एसटी चालक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक सेवकांवर वाढत्या हल्ल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026