आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि एसके फायनान्स यांची भागीदारी; क्रेडिट लाइफ सोल्यूशन्स सादर

मुंबई, 26 फेब्रुवारी 2026: भारतातील आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांपैकी (NBFC) एक असलेल्या एसके फायनान्स लिमिटेडने आज आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. या सहकार्याअंतर्गत एसके फायनान्सच्या ग्राहकांना समूह क्रेडिट संरक्षण विमा उपाय उपलब्ध करून दिले जातील. त्यायोगे त्यांना आवश्यक आर्थिक संरक्षण मिळेल.

ग्रामीण आणि निमशहरी भौगोलिक क्षेत्रांमध्ये मजबूत स्थान असलेली एसके फायनान्स 9.3 लाखांहून अधिक ग्राहकांना ग्राहक-केंद्रित क्रेडिट लाइफ विमा उपायसुविधा पुरवेल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी देण्यास सक्षम करेल.

हा सहयोग जबाबदार कर्ज घेण्यास प्रोत्साहन देईल आणि विशेषतः वंचित समुदायांमध्ये सोपे व अखंडित कर्ज विमा सादर करून अधिक चांगले आर्थिक संरक्षण उपलब्ध करून देईल. क्रेडिट लाइफ उत्पादने ग्राहकांना जोखीम अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत करतात आणि कुटुंबाची आर्थिक योजना विस्कळीत होणार नाही याची खात्री देतात.

या सहकार्याबाबत भाष्य करताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या क्रेडिट लाइफ आणि संरक्षण विभागाचे वितरण प्रमुख श्री. उपेंद्र प्रभू म्हणाले, “देशातील आघाडीच्या एनबीएफसींपैकी एक असलेल्या एसके फायनान्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. विमा क्षेत्रातील प्रसार वाढविण्यासाठी आणि ‘इन्शुरन्स फॉर ऑल’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वितरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही भागीदारी आमच्या कंपनीच्या जीवन विमा अधिक सुलभ करण्याच्या आणि ग्राहकांच्या दीर्घकालीन आर्थिक संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

दोन्ही संस्थांची उभारणी ग्राहक-केंद्रित तत्त्वांवर झाली असून ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्याचा आमचा उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट लाइफ उत्पादनामुळे एखाद्या अनपेक्षित घटनेच्या प्रसंगी ग्राहक प्रलंबित कर्जाच्या स्वरूपातील देणी नाहीत तर आपल्या कुटुंबासाठी मालमत्ता मागे ठेवतात.”

या धोरणात्मक भागीदारीबाबत एसके फायनान्स लिमिटेडचे पूर्णवेळ संचालक श्री. यश सेठिया म्हणाले, “आमचे ध्येय केवळ कर्ज पुरविण्यापुरते मर्यादित नाही. आमच्या ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचण तसेच कर्जाच्या देयकांपासून संरक्षण देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्ससोबतची ही भागीदारी आमच्या ‘एसके बीमा’ या विमा विभाग अंतर्गत ‘नया भारत’साठी एकात्मिक कर्ज आणि जोखीम संरक्षण उपाय पुरविण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.”

हा सहयोग दोन्ही संस्थांच्या जीवन विमा सुलभ करण्याच्या आणि ग्राहकांच्या दीर्घकालीन आर्थिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे.