चेन्नई, फेब्रुवारी २०२६ स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनएसई: स्टारहेल्थ, बीएसई: ५४३४१२) या भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीने सोमवारी आपल्या कॉर्पोरेट सामाजिक दायीत्व उपक्रमांतर्गत ९राज्यांमध्ये ३२ ‘आरोग्य सेवा केंद्रे’ (एएसके) सुरू करण्याची घोषणा केली. समुदाय पातळीवर प्राथमिक आरोग्यसेवेची उपलब्धता अधिक साध्य करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पिरामल फाऊंडेशनचा भाग असलेल्या पिरामस स्वास्थ्य यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेली ही ‘आरोग्य सेवा केंद्रे’ (एएसके) रुग्णांना मोफत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करतील. या सेवांमध्ये डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला, रक्तक्षय (अॅनिमिया), मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांच्या (एनसीडी) तपासणीसाठी प्रयोगशाळा चाचण्या, आवश्यक औषधे, समुपदेशन तसेच प्रौढांसाठी न्यूमोकोकल लसीकरणासंबंधी सहाय्य यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात ही ‘आरोग्य सेवा केंद्रे’ ३२ महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. तामिळनाडूमधील नागरकोइल, तूतीकोरिन, तिरुप्पूर, चेन्नई आणि करूर; कर्नाटकातील म्हैसूरू, हुबळी, बेळगावी, दावणगेरे आणि बल्लारी; तेलंगणातील निजामाबाद, खम्मम, करीमनगर आणि महबूबनगर; आंध्र प्रदेशातील कुर्नूल आणि विशाखापट्टणम; ओडिशातील राउरकेला आणि ब्रह्मपूर; पंजाबमधील बठिंडा, अमृतसर आणि पटियाला; उत्तर प्रदेशातील गोरखपूर, मथुरा, प्रयागराज आणि अलीगड; पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि सिलीगुडी; तसेच महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अकोला या शहरांचा त्यात समावेश आहे.
भारतामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अनेक वेळा गंभीर गुंतागुंत निर्माण होत नाही तोपर्यंत या आजारांचे निदान होत नाही. या नऊ राज्यांतील संबंधित जिल्ह्यांमध्ये प्रौढांमधील उच्च रक्तदाबाचे प्रमाण सुमारे २० ते ४० टक्क्यांदरम्यान आहे, तर काही भागांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जवळपास २९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आनंद रॉय म्हणाले:
“भारतामधील आरोग्यसेवा व्यवस्थेची चर्चा ही समाजाच्या तळागाळातून सुरू झाली पाहिजे. असंसर्गजन्य आजारांच्या (NCD) वाढत्या संकटावर केवळ रुग्णालयांवर अवलंबून राहून आपण मात करू शकत नाही. आमच्या मते, आरोग्यसेवेतील समानतेची खरी सुरुवात ही प्राथमिक आरोग्यसेवेपासूनच होते.
नियमित तपासणी, आवश्यक औषधे आणि नियमित फॉलो-अप सेवा सहज उपलब्ध होतात, तेव्हा गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वीच आजारांवर नियंत्रण मिळवता येते. आरोग्य व्यवस्थेतील सर्व संस्थांची पायाभूत व्यवस्थेला अधिक प्रबळ करणे सामायिक जबाबदारी आहे. या सीएसआर उपक्रमाद्वारे आम्ही त्या सामूहिक प्रयत्नात योगदान देत आहोत आणि प्राथमिक आरोग्यसेवा लोकांपर्यंत वेळेत, विश्वासार्ह पद्धतीने आणि त्यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचेल, याची खात्री करत आहोत.”
प्रत्येक ‘आरोग्य सेवा केंद्रा’त (एएसके) पुढील सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असतील:
- एमबीबीएस पात्र डॉक्टरांकडून तपासणी व सल्लामसलत
- उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच तोंडाच्या आरोग्याशी संबंधित आजारांची तपासणी
- रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, आरडीटी इत्यादी प्रयोगशाळा चाचण्या
- सर्वसाधारण आजारांकरिता, तसेच दीर्घकालीन व्याधींकरिता आवश्यक औषधे
- आरोग्यविषयक समुपदेशन व जनजागृती सत्रे
- पात्र लाभार्थ्यांसाठी न्यूमोकोकल लसीकरणासंदर्भातील सहाय्य
‘आरोग्य सेवा केंद्रे’ (एएसके) समर्पित वैद्यकीय पथकांसह कार्यरत राहतील. निश्चित सेवा प्रोटोकॉलनुसार रुग्णांची सातत्यपूर्ण तपासणी आणि नियोजित फॉलो-अप याची विशेष काळजी घेतली जाईल, जेणेकरून उपचार प्रक्रिया सुसंगत आणि परिणामकारक राहील.
या उपक्रमासाठी लागणारा भांडवली आणि दैनंदिन कार्यकारी खर्च स्टार हेल्थकडून त्यांच्या सीएसआर निधीतून केला जाणार आहे, तर पिरामल स्वास्थ्य अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापन आणि वैद्यकीय प्रशासनाची जबाबदारी सांभाळणार आहे.
पिरामल ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल म्हणाले:
“गेल्या १७ वर्षांत पिरामल फाउंडेशनने देशातील सर्वात आव्हानात्मक भौगोलिक भागांमध्ये काम केले आहे. समुदायाशी सखोल संवाद आणि व्यवस्थात्मक परिवर्तन या तत्त्वांवर आमचे कार्य आधारित राहिले आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्ससोबतची ही सीएसआर भागीदारी त्या परंपरेलाच पुढे नेणारी आहे. या माध्यमातून विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा प्रत्यक्ष समुदायांपर्यंत पोहोचवली जाईल. सुलभ सल्लामसलत, निदान सुविधा आणि मोफत औषधांच्या माध्यमातून दशलक्षहून अधिक नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
न्यूमोकोकल संसर्ग हा श्वसनाशी संबंधित आजारांच्या वाढत्या भारात महत्त्वाचा घटक आहे. फायझर कंपनी लसीकरणातील आपले ज्ञान आणि नैपुण्य वापरून या उपक्रमाची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढवत आहे.
फायझर इंडियाचे मार्केट ॲक्सेसस संचालक सरल गुप्ता म्हणाले:
“प्रौढांचे लसीकरण हा भारताच्या प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा, पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. समुदायामध्ये होणाऱ्या न्यूमोनियाच्या जागतिक एकूण रुग्णभारापैकी सुमारे २३ टक्के भार भारतावर आहे. विशेषतः उच्च जोखमीच्या प्रौढ गटांपर्यंत लसीकरणाची उपलब्धता वाढवणे हे अशा लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचा एकूण परिणाम कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे. ‘आरोग्य सेवा केंद्र’ उपक्रमात प्रौढ लसीकरणाला अविभाज्य घटक म्हणून स्थान दिल्याबद्दल आम्ही स्टार हेल्थचे अभिनंदन करतो आणि आमच्या तज्ज्ञतेच्या माध्यमातून या उपक्रमाला सातत्याने सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे.”
या उपक्रमाद्वारे आमचा दशलक्षहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये असंसर्गजन्य आजारांचा (एनसीडी) भार अधिक आहे आणि प्राथमिक आरोग्यसेवेच्या उपलब्धतेत तफावत आढळते, अशा भागांची निवड करून ही क्लिनिक्स सुरू करण्यात आली आहेत.
चेन्नई येथे झालेल्या या उद्घाटनाने प्रतिबंधात्मक, सुलभ आणि सातत्यपूर्ण प्राथमिक आरोग्यसेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या दीर्घकालीन आणि संरचित सीएसआर उपक्रमाची औपचारिक सुरुवात झाली आहे.








