प्रत्येक स्वाइपने मिळवा अधिक सुविधा: प्रवास आणि लाईफस्टाईल अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी ॲक्सिस बँक आणि इंडिगोकडून को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सचे अनावरण

राष्ट्रीय, फेब्रुवारी 2026: भारतीय ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली ॲक्सिस बँक आणि भारतीयांची पसंतीची एअरलाइन इंडिगो यांनी भागीदारी केली आहे. इंडिगो ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि इंडिगो अ‍ॅक्सिस बँक प्रीमियम क्रेडिट कार्ड या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असलेले हे कार्ड इंडिगोचा लॉयल्टी प्रोग्राम, इंडिगो ब्लूचिपद्वारे ग्राहकांना बक्षीस देण्यासाठी विचारपूर्वक तयार केले गेले आहेत.

दैनंदिन खरेदी आणि प्रवासाशी संबंधित खर्चावर सोयीस्कर आणि त्रासमुक्त रिवॉर्ड मिळवणे हा या सहकार्याचा उद्देश आहे. इंडिगो चॅनेलवरील खर्चासाठी दोन्ही कार्ड्स जलद कमाईसह योग्य व्यवहारांवर इंडिगो ब्लूचिप्स देतात. ग्राहकांना नवीन कार्ड तसेच नूतनीकरण फायदे, माइलस्टोन रिवॉर्ड्स आणि निवडलेल्या कार्ड प्रकारानुसार लाउंज ॲक्सेस, मनोरंजन ऑफर, जेवणाच्या सवलती आणि कमी फॉरेक्स मार्कअपसह विशेष लाइफस्टाइल अधिकारांचा देखील आनंद घेता येईल.

इंडिगो अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डची किंमत ₹799 अधिक जीएसटी आहे आणि ते किरकोळ विक्री क्षेत्राला लक्ष्य करते. या कार्डमुळे प्रवास आणि लाइफस्टाइलशी संबंधित फायद्यांचा उत्तम वापर करता येतो. तसेच प्रमुख खर्च श्रेणींमध्ये जलद रिवॉर्ड्स मिळतात.

इंडिगो अ‍ॅक्सिस बँक प्रीमियम क्रेडिट कार्डज्याची किंमत 5,000 अधिक जीएसटी आहे, ते उत्तम प्रवास आणि जीवनशैली फायद्यांची अपेक्षा करणाऱ्या श्रीमंत ग्राहकांसाठी डिझाइन केलेले आहे.

हे कार्ड RuPay आणि Visa नेटवर्कवर लाँच केले जातील.

या लाँचिंगबद्दल अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड्सपेमेंट्स आणि वेल्थ मॅनेजमेंटच्या अध्यक्षा आणि प्रमुख अर्णिका दीक्षित म्हणाल्या, आमच्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी बँकिंग आणि प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय एकत्र करत इंडिगोसोबतच्या आमच्या धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सच्या लाँचिंगसहआम्ही कधीतरी प्रवास करणारे आणि वारंवार प्रवास करणाऱ्याअशा दोन्ही प्रकारच्या प्रवाशांना खास सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. विशेष प्रवास फायदेजलद रिवॉर्ड कमाई आणि प्रत्येक प्रवास अधिक फायदेशीर बनवणाऱ्या विशेष अधिकारांची सुविधा मिळण्यासाठी ही कार्डे डिझाइन केलेली आहेत. हे सहकार्य नावीन्यपूर्णता आणि ग्राहक-केंद्रिततेसाठी आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते आणि आम्ही आमच्या कार्डधारकांना अधिक स्वातंत्र्यलवचिकता आणि विविध सोयींसह सक्षम करण्यास उत्सुक आहोत.”

इंडिगोचे मुख्य डिजिटल आणि माहिती अधिकारी नीतन चोप्रा म्हणाले, इंडिगो आपल्या ग्राहकांनाविशेषतः वारंवार प्रवास करणाऱ्या ग्राहकांनासातत्याने  उत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि अ‍ॅक्सिस बँकेसोबतची आमची भागीदारी या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच करण्याची आम्हाला उत्सुकता आहेजे दररोजच्या खर्चाचे इंडिगो ब्लूचिप्समध्ये रूपांतर करतात आणि इंडिगोच्या सोईस्करविश्वासार्ह सेवेला अ‍ॅक्सिस बँकेच्या विस्तृत बँकिंग नेटवर्कशी जोडतात. आम्हाला खात्री आहे कीप्रीमियम जीवनशैली फायद्यांसह हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आमच्या ग्राहकांचा  इंडिगोसोबतचा अनुभव अधिक फायदेशीर बनवतील.”

या लाँचबद्दल एनपीसीआयच्या कार्यकारी संचालक सोहिनी राजोला म्हणाल्या, एनपीसीआयने नेहमीच ग्राहकांना सुरक्षितस्केलेबल आणि सोईस्कर डिजिटल पेमेंट अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रुपे नेटवर्कवर इंडिगो अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड लाँच करणे हे आमच्या या लक्ष्याशी सुसंगत आहे. ते ग्राहकांना रुपे प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेद्वारे समर्थित विविध खर्चांवर फायदे मिळविण्याचा एक संरचित आणि फायदेशीर मार्ग प्रदान करते. भारताची डिजिटल पेमेंट इकोसिस्टम विकसित होत असतानाअशा सहकार्यामुळे ग्राहकांना पर्याय मिळतात आणि एकसंध आणि सर्वसमावेशक पेमेंट वातावरणाचा पाया मजबूत होण्यास मदत होते.”

व्हिसाचे भारतातील कंट्री मॅनेजर ऋषी छाब्रा म्हणाले, भारतीय ग्राहकांना आज केवळ व्यवहार नाही तर त्यापेक्षाही काही अधिक हवे आहे. त्यांच्या आकांक्षाप्राधान्यक्रम आणि जीवनशैली प्रतिबिंबित करणारे अनुभव हवे आहेत. इंडिगो-अ‍ॅक्सिस बँक व्हिसा को-ब्रँडेड कार्ड्सचे लाँचिंग त्यादृष्टीनेच करण्यात आले आहे. प्रवास रिवॉर्ड्स आणि अर्थपूर्ण जीवनशैली एकत्रित करूनआम्ही आमच्या कार्डधारकांना प्रत्येक क्षण आणि प्रत्येक प्रवासातून अधिक मिळविण्यास सक्षम करत आहोत. भारताच्या वाढत्या ग्राहक आधाराच्या विकसित होत असलेल्या गरजांशी सुसंगत राहून ही भागीदारी सुरक्षितअखंड आणि समृद्ध पेमेंट अनुभव प्रदान करण्यासाठी व्हिसाची वचनबद्धता दर्शवते.”

तुमचा प्रवासतुमची निवड: तुमच्या खर्च करण्याच्या सवयीनुसार तयार केलेली दोन कार्डे:

इंडिगो अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड इंडिगो अ‍ॅक्सिस बँक प्रीमियम क्रेडिट कार्ड
 

·         प्रत्येक खर्चाला बक्षीस : पात्र श्रेणींमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक ₹100 साठी 1 ब्लूचिप मिळवा

 

·         श्रेणी-आधारित बूस्ट्स: किराणा आणि जेवणाच्या व्यवहारांवर प्रत्येक ₹100 साठी 2 ब्लूचिप आणि इंडिगो चॅनेल व्यवहारांवर प्रत्येक ₹100 साठी 3 ब्लूचिप मिळवा

 

·         प्रवासाचे फायदे: सहभागी झाल्यावर, नूतनीकरण झाल्यावर आणि खर्चाचा टप्पा गाठल्यावर 1,200 ब्लूचिप व्हाउचरचा फायदा

 

·         UPI फायदा: UPI व्यवहारांवर जलद रिवॉर्ड कमाई

 

·         लाउंज ॲक्सेस: अतिरिक्त आरामासाठी डोमेस्टिक विमानतळ लाउंज ॲअॅक्सेस मोफत

 

·         अनोखी बक्षिसे: इंडिगोच्या खर्चावर प्रति ₹100 साठी 7 ब्लूचिप, हॉटेल्स आणि किराणा सामानावर प्रति ₹100 साठी 3 ब्लूचिप आणि इतर पात्र श्रेणींवर खर्च केलेल्या प्रत्येक ₹100 साठी 2 ब्लूचिप

 

·         स्पर्धात्मक फॉरेक्स दर: आंतरराष्ट्रीय खर्चावर फक्त 2.5% च्या कमी केलेल्या फॉरेक्स मार्कअपचा लाभ घ्या

 

·         स्वागतनूतनीकरण आणि माइलस्टोन बोनस: सामील झाल्यावर, नूतनीकरण आणि माइलस्टोन खर्च साध्य केल्यावर 5,000 ब्लूचिप किमतीचे व्हाउचर मिळवा

 

·         व्यापक लाउंज प्रवेश: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये मोफत प्रवेशाचा आनंद घ्या

 

·         खास जीवनशैली सुविधावाढत्या दैनंदिन अनुभवांसाठी BookMyShow आणि EazyDiner वर ऑफर मिळवा