पुणे,30 डिसेंबर 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर आणि हडपसर मेडिकल असोसिएशन (एचएमए) यांच्या सहयोगाने सहाव्या नोबल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात शैलेंद्र शिंदे(नाबाद 79धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीएचडीए शिवाजीयन्स संघाने शिरूर सनरायझर्स संघावर 1 धावेने थरारक विजय मिळवत विजेतेपद संपादन केले.
मगरपट्टा सिटी येथील एसइझेड मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत पीएचडीए शिवाजीयन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 10षटकात 5बाद 126धावा केल्या. यात शैलेंद्र शिंदेने 33 चेंडूत 7 चौकार व 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 79 धावा, विशाल मुंढेने 21 धावा, अतुल झोळेकरने 16 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना शिरूर सनरायझर्स संघाला 10 षटकात 5 बाद 125 धावा करता आल्या. यात सुयोग ढमढेरे नाबाद 55 धावा, मयूर मांडले 26 धावा, अविनाश गावडे 24 धावा यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. पीएचडीए शिवाजीयन्सकडून श्रीकांत लोकरे (3-24), प्रशांत टिळेकर(1-26) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 1 धावेने विजय मिळवून दिला.
या स्पर्धेत तब्बल ३५० डॉक्टर्स सहभागी झाले होते. या प्रतिष्ठित नोबल प्रीमियर लीगच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने, डॉ एच.के.साळे,दशरथ जाधव, डॉ मंगेश लिंगायत , डॉ संपत डुंबरे पाटील, डॉ राहुल झांजुर्णे, डॉ प्रकाश दुबे पाटील, डॉ शैलेश पाटील, डॉ योगेश सातव , एचएमएचे अध्यक्ष डॉ. मनोज कुंभार, एचएमएचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ,एचएमएचे सचिव डॉ. राजेश खुडे, एचएमएचे इलेक्ट प्रेसिडेंट डॉ. स्वप्नील लडकत, डॉ.चंद्रकांत हरपाळे, मालोजी तनपुरे, अविनाश पाडळ, कुलभूषण शिरोळे, राज कोद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत नोबल एचएमए वॉरियर्स, पुरंदर चॅम्पियन्स, एचएमए ब्रिगेड, बीड ब्लास्टर्स, डब्ल्यूडीए, विमल फायटर्स, बारामती किंग्स इलेव्हन, प्राईम प्लस वॉरियर्स, फलटण डेअर डेव्हिल्स, एचएमए जागृती सनरायझर्स, एचएमए एवेंजर्स, केडगाव मावळा, सिंहगड लायन्स, पीएचडीए शिवाजीयन्स, तिरंगा, डेंटल चॅम्पियन्स, शिरूर सनरायझर्स, आर्यनग्लान्स सातारा या संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत राज्यातील बीड, बारामती, फलटण, सातारा, पुणे, शिरूर, केडगाव येथील ठिकाणांहून 18 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 70,707/- आणि उपविजेत्या संघाला करंडक व 50,505/- अशी पारितोषिके देण्यात आली.
निकाल:- अंतिम फेरी:-
पीएचडीए शिवाजीयन्स: 10 षटकात 5बाद 126 धावा (शैलेंद्र शिंदे नाबाद 79(33,7×4, 6×6), विशाल मुंढे 21, अतुल झोळेकर 16, राजेंद्र गदादे 2-17, प्रवीण निर्वाणे 1-23, सुयोग ढमढेरे 1-26) वि.वि.शिरूर सनरायझर्स: 10 षटकात 5 बाद 125 धावा (सुयोग ढमढेरे नाबाद 55 (28, 4×4,4×6), मयूर मांडले 26, अविनाश गावडे 24, श्रीकांत लोकरे 3-24, प्रशांत टिळेकर 1-26); सामनावीर – शैलेंद्र शिंदे; पीएचडीए शिवाजीयन्स संघ 1 धावेने विजयी.









