२ जानेवारीपासून पुणे पेशवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल; जगभरातील ६० लघुपटांची मेजवानी

By: Editor_Manas

On: Tuesday, December 30, 2025 4:50 PM

Google News
Follow Us

पुणे प्रतिनिधी – पुणे शहरात लघुपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या  ‘पुणे पेशवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चा दुसरा सिझन २ व ३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पं. जवाहरलाल नेहरू संस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे होणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातून निवडलेले ६० दर्जेदार लघुपट प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहेत. अशी माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फेस्टिव्हचे आयोजक अनुप ढेकणे, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि मुबारक तांबोळी यांनी दिली.

हा महोत्सव नवोदित व स्वतंत्र फिल्ममेकरसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, सहभागी प्रत्येक लघुपटाला १६ चित्रभाषा घटकांवर आधारित ‘मायक्रो फीडबॅक शीट्स’ दिल्या जाणार आहेत. तांत्रिक विश्लेषणासह सखोल अभिप्राय देणारा हा भारतामधील एकमेव शॉर्ट फिल्म फेस्टिवल असल्याचे आयोजकांनी सांगितले.

महोत्सवाचा उद्घाटन समारंभ २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे, ‘सैराट’ फेम अभिनेता भूषण मंजुळे, आगामी ‘रुबाब’ चित्रपटातील कलाकार संभाजी ससाणे व शीतल पाटील, तसेच बिग बॉस फेम कॉस्च्युम डिझायनर कुणाल फडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

३ जानेवारी रोजी रात्री ८ वा. होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अमर देवकर, अभिनेता शशांक शेंडे, निर्माता डॉ. संतोष पोटे आणि पटकथाकार संजय नवगिरे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. स्पर्धा विभागासाठी परीक्षक म्हणून राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक वीरेंद्र वळसंगकर आणि सिनेसमीक्षक मितेश ताके काम पाहणार आहेत. या महोत्सवाला दररोज सुमारे ३०० हून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित असून, प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमातून नवोदित दिग्दर्शक व कलाकारांना महत्त्वाचे व्यासपीठ मिळणार असून, पुण्यातील चित्रपट रसिकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे फेस्टिव्हचे आयोजक अनुप ढेकणे, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि मुबारक तांबोळी यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 14, 2026