अभिजात गीतांच्या सुरांतून ‘गौरव मायबोलीचा’ कार्यक्रम उत्साहात पार

By: Editor_Manas

On: Monday, December 29, 2025 3:11 PM

Google News
Follow Us

पुणे : अभिजात मराठी गीतांचा खास सांगीतिक कार्यक्रम ‘गौरव मायबोलीचा’ एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे मोठ्या उत्साहात आणि रसिकांच्या भरभरून प्रतिसादात पार पडला. लोकसंगीतापासून सुगम, भावगीत, भक्तीगीत आणि चित्रपट संगीतातील निवडक गीतांचा सुरेल प्रवास या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

प्रसिद्ध गायक राजेश दातार आणि शीतल म्हसतकर यांनी आपल्या सशक्त, भावस्पर्शी आणि परिपक्व गायनातून मराठी गीतांची अभिजातता प्रभावीपणे उलगडली. ‘निबोणीच्या झाडामागे’, ‘नाच रे मोरा’, ‘पाहिले न मी तुला’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘वेडात मराठे वीर दौडले’ यांसारख्या एकाहून एक बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन शीतल म्हसतकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे संयत आणि अभ्यासपूर्ण निवेदन अभय गोखले यांनी केले. वाद्यवृंदामध्ये सुभाष देशपांडे, अमृता ठाकूर देसाई (सिंथेसायझर), राजेंद्र दूरकर (तबला), ऋतुराज कोरे (रिदम मशीन), संपदा खरे (हार्मोनियम) आणि अभय ओक (बासरी) यांनी आपल्या सादरीकरणातून गायनाला प्रभावी साथ दिली.

ध्वनिसंयोजनाची जबाबदारी केदार शहा, छायाचित्रण नागेश झळकी, तर व्हिडिओ व व्हिज्युअल्स विक्रम अंबिके यांनी समर्थपणे सांभाळली. ‘गौरव मायबोलीचा’ या कार्यक्रमातून मराठी भाषा आणि संगीतातील अभिजात वारशाचा गौरव अत्यंत भव्य, दर्जेदार आणि संस्मरणीय स्वरूपात साकार झाला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026