पीएनजी ज्वेलर्स ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ च्या माध्यमातून आपल्या विस्तारासाठी सज्ज

पुणे, डिसेंबर 2025: पीएनजी ज्वेलर्सच्या समकालीन व हलक्या वजनाच्या फाईन ज्वेलरी ब्रँड ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ ने सारा तेंडुलकरला आपली ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’च्या या निर्णयामुळे भारतातील नवीन पिढीतील दागिनेप्रेमी असलेल्या ग्राहकांशी ब्रँडचे नाते अधिक दृढ करणे हा यामागील हेतू आहे.

या सहयोगामुळे पीएनजी ज्वेलर्सच्या वारसागत ग्राहकांपासून भविष्यातील ग्राहकांपर्यंतचा दुवा म्हणून ‘लाइटस्टाईल’ची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. जवळपास दोनशे वर्षांचा विश्वास असलेल्या पीएनजी ज्वेलर्सच्या परंपरेसोबतच, ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ हा ब्रँड पुढील पिढीसाठी आधुनिक रिटेल फॉरमॅट, समकालीन डिझाइन आणि ओम्नी-चॅनल अनुभवावर आधारित जाणीवपूर्वक उभारण्यात आला आहे.

‘लाइटस्टाईल’च्या विस्तारामागील व्यापक दृष्टिकोनाबाबत बोलताना, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, “लाइटस्टाईल बाय पीएनजी ही आमच्या विद्यमान ग्राहकांना आणि भविष्यातील ग्राहकांना जोडण्याची दीर्घकालीन आणि जाणीवपूर्वक आखलेली योजना आहे. पीएनजीने पिढ्यान्‌पिढ्या विश्वास कमावला असला तरी, आजच्या तरुण ग्राहकांच्या विचारसरणी, खरेदी पद्धती आणि अभिव्यक्तीशी सुसंगत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. लाइटस्टाईल ही केवळ पारंपरिक प्रसंगांसाठी नव्हे, तर दैनंदिन क्षणांसाठी डिझाइन केलेली आधुनिक रिटेल संकल्पना आहे, ज्यामध्ये मजबूत ओम्नी-चॅनल उपस्थिती आहे. ‘लाइटस्टाईल’ विशिष्ट काळासाठी फॅशन उपक्रम नसून, पीएनजी अंतर्गत एक स्वतंत्र ब्रँड आहे. लाइटस्टाईलच्या स्वतंत्र स्टोअर्सना मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, आम्ही हा ब्रँड संरचित पद्धतीने विस्तारण्यास सज्ज आहोत.”

सारा तेंडुलकरची सुंदरता,आधुनिक दृष्टिकोन आणि मजबूत डिजिटल उपस्थिती ही ब्रँडच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. इंस्टाग्रामवर 8.9 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या साराला तिच्या साध्या, प्रामाणिक आणि संतुलित स्टाईलसाठी ओळखले जाते. आकर्षक डिझाइन, मिनिमल सौंदर्य आणि उत्तम आणि साधी फॅशनमुळे तिची पसंती ‘लाइटस्टाईल’च्या डिझाइन मुल्यांशी उत्तम जुळते.

या सहयोगाबद्दल बोलताना सारा तेंडुलकर म्हणाली, “लाइटस्टाईल, सहजता आणि वैयक्तिक स्टाईल प्रतिबिंबित करणारा ब्रँड आहे, जी मला अधिक आकर्षित आणि स्वाभाविक वाटते. ही ज्वेलरी हलकी, विचारपूर्वक डिझाइन केलेली आणि दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे लाइटस्टाईलसारख्या ब्रँडचा चेहरा होण माझ्यासाठी खूपच उत्साहवर्धक आहे.”

याबाबत अधिक माहिती देताना, लाइटस्टाईल बाय पीएनजीचे मार्केटिंग आणि ई-कॉमर्स हेड, हेमंत चव्हाण, म्हणाले, “लाइटस्टाईल ज्या तरुण महिलांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्या आत्मविश्वासी, आधुनिक आणि स्वतःच्या पद्धतीने व्यक्त होणे पसंत करतात, त्यांचे सारा उत्तम प्रतिनिधित्व करते. लाइटस्टाईलच्या माध्यमातून तरुण ग्राहकांशी सारा उत्तमरित्या जोडली जाईल ज्यामुळे भविष्यातील ग्राहकांसाठी पसंतीची ज्वेलरी डेस्टिनेशन बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळेल.”

ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सारा लाइटस्टाईलच्या विविध ब्रँड आणि कलेक्शन मोहिमांमध्ये सहभागी होणार असून, डिजिटल उपक्रम, मीडिया संवाद आणि प्रमुख स्टोअर लॉन्चमध्येही ती दिसणार आहे. निवडक कलेक्शन्ससाठी ती स्टाईल म्यूजची भूमिकाही बजावेल. हा दोन वर्षांचा करार डिसेंबर 2025 पासून सुरू होत असून, सारा सहभागी असलेली कलेक्शन्स मार्च 2026 पासून सादर केली जाणार आहेत.

‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ पीएनजी अंतर्गत स्वतंत्र ब्रँड असून, पारंपरिक किंवा सणासुदीच्या प्रसंगांपुरते मर्यादित न राहता स्वतःसाठी, भेटवस्तू म्हणून किंवा दैनंदिन वापरासाठी ज्वेलरी खरेदी करणाऱ्या महिलांना लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. ब्रँडची मजबूत ओम्नी-चॅनल धोरण भौतिक स्टोअर्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि कंटेंट-आधारित संवाद यांचा समन्वय साधते.

पुणे आणि गोवा येथील स्वातंत्र्य स्टोअर्सना मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादानंतर, ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी’ आता संरचित विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. FY 2028 पर्यंत सुमारे 50 स्टोअर्स उघडण्याचे नियोजन असून, यात कंपनी मालकी आणि फ्रँचायझी अशा दोन्ही स्वरूपांचा समावेश असेल. यासोबत मजबूत ऑनलाइन स्टोअर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. विस्ताराचा पहिला टप्पा महाराष्ट्रात केंद्रित असेल, त्यानंतर भारतातील इतर भागांमध्ये देखील विस्तार करण्यात येणार आहे.