पुणे, नोव्हेंबर 2025— प्रीमियम मेटल आणि सस्टेनेबल पेमेंट सोल्यूशन्समध्ये काम करणाऱ्या फेडरल कार्ड सर्व्हिसेस (FCS) ने भारतात MATE फाउंडेशनची अधिकृत स्थापना जाहीर केली. हा उपक्रम कंपनीचे पार्टनर आणि CEO मातियास गाईन्झा यूरनेकिअन आणि पार्टनर व चेयरमन क्रिस्तियान कालान्द्रिया यांनी सुरू केला आहे. फुटबॉलवरील त्यांची समान आवड आणि खेळाच्या माध्यमातून समुदायांमध्ये बदल घडवता येऊ शकतो या विचारातून फाउंडेशनची कल्पना आकारली. MATE फाउंडेशनचा उद्देश वंचित विद्यार्थ्यांना संरचित फुटबॉल प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि पुढे समावेशक आणि व्यावसायिक अकादमी इकोसिस्टम उभारणे हा आहे. फाउंडेशन शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि खेळात लिंग-समानतेवर भर देणार आहे.
भारतामधील कामाची सुरुवात फाउंडेशनने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (ZPPS) विद्यार्थ्यांसोबतच्या पहिल्या फुटबॉल कार्यक्रमाने केली. तिसरी ते पाचवीतील मुलांनी बेसिक ड्रिल्स, कोचिंग आणि एक छोटा मैत्रीपूर्ण सामना खेळला. या कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनचे संस्थापक — मातियास गाईन्झा यूरनेकिअन आणि क्रिस्तियान कालान्द्रिया — तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत झाले.कार्यक्रमाला फाउंडेशनचे संस्थापक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमात ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला — ३९ मुले आणि ३२ मुली. सुरुवातीपासूनच मुलगा–मुलगी समान सहभाग ठेवण्यावर फाउंडेशनचा भर स्पष्टपणे दिसून आला.
आपल्या विस्तार आराखड्याचा भाग म्हणून MATE फाउंडेशन पुढील वर्षात सरकारी आणि ग्रामीण शाळांशी भागीदारी करण्याचे लक्ष्य ठेवत आहे. या वाढत्या शाळांच्या नेटवर्कद्वारे फाउंडेशनचे उद्दिष्ट एक मजबूत कम्युनिटी प्रोग्राम उभारण्याचे आहे, ज्यामध्ये मुलगे आणि मुली दोघांनाही समान संधी मिळेल, आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्रम विकसित होत असताना फुटबॉलमधील संभाव्य करिअर मार्ग शोधता येतील. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला औपचारिकरीत्या MATE फाउंडेशनचा सदस्य म्हणून नोंदवले जाईल आणि कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांप्रमाणे त्यांना संरचित प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक पाठबळ दिले जाईल.
मातियास गाईन्झा यूरनेकिअन, संस्थापक, MATE फाउंडेशन, म्हणाले: “अर्जेंटिना फुटबॉल जगते, श्वास घेते आणि हा खेळ आयुष्य बदलू शकतो, हे आम्ही स्वतः अनुभवलं आहे. ज्यांनी कधीच खेळात भविष्याची कल्पना केली नसेल अशा भारतातील मुलांमध्ये हीच ऊर्जा, आवड आणि तोच विश्वास MATE फाउंडेशनच्या माध्यमातून निर्माण करायचा आहे. भारताने आम्हाला ज्या ऊब आणि उदारतेने स्वीकारलं, त्याला प्रत्युत्तर देण्याचा हा आमचा मार्ग आहे. आम्ही दरवर्षी वाढणारे आणि ज्या समुदायांसोबत काम करतो, तिथे खरा, दीर्घकालीन बदल घडवणारे अकादमी मॉडेल उभारण्यास कटिबद्ध आहोत.”
क्रिस्तियान कालान्द्रिया, संस्थापक, MATE फाउंडेशन, म्हणाले: “फुटबॉल हा प्रत्येकाचा खेळ आहे. प्रत्येक मुलाला आत्मविश्वासाने मैदानात उतरायचा हक्क आहे—स्वाभिमानाने, आणि चमकण्याच्या समान संधींसह. शिस्त, समानता आणि स्वतःवरचा विश्वास या खेळातून मिळणारे धडे त्याच्या आयुष्यातील इतर सर्व क्षेत्रांमध्येही उपयोगी पडतात. भारतातील MATE फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट असे आहे की वंचित समुदायातील मुलं–मुलींनी फुटबॉलचा अनुभव केवळ खेळ म्हणून नव्हे, तर संधी, सक्षमीकरण आणि आयुष्यभराच्या विकासाचा मार्ग म्हणून घ्यावा.”
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना खालील सुविधा दिल्या जातील:
- पात्र आणि प्रशिक्षित कोचेसकडून साप्ताहिक प्रशिक्षण
- जर्सीज, स्पोर्ट्स किट्स, फुटबॉल साधनसामग्री आणि आवश्यक साहित्य
- सुरक्षित आणि देखरेखीखालील प्रशिक्षण मैदानांचा वापर
- शिस्त, टीमवर्क आणि नेतृत्व विकसित करणारा संरचित प्रशिक्षण मार्ग
- एकूण शारीरिक विकासासाठी ताकद आणि फिटनेसवरील नियमित सराव
हा कार्यक्रम पुण्यात पूर्ण क्षमतेची फुटबॉल अकादमी विकसित करण्याच्या बहुपायरी योजनेतील पहिला टप्पा आहे. प्रशिक्षित कोचेस, आवश्यक सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन भागीदारी यांच्या आधारावर ही अकादमी उभारण्याची योजना आहे.
अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय ओळखीमध्ये खोलवर रुजलेला आणि जगभरात प्रशंसित असलेला फुटबॉल — त्याची ही आवड आणि तज्ज्ञता फाउंडेशन भारतात एकाच उद्देशाने आणत आहे: लिंग किंवा पार्श्वभूमी कोणतीही असो, प्रत्येक मुलाला या खेळाची जागतिक दर्जाची प्रारंभिक ओळख आणि त्यातून मिळणाऱ्या मूल्यांचा अनुभव मिळावा.








