फ्लेव्हर्ड मिल्क पश्चिम भारतात बनले आहे रोजच्या दिवसाचा दुग्धआहार

पुणे, नोव्हेंबर 2025: गोदरेज जर्सी यांनी ‘गोदरेज जर्सी इंडिया लॅक्टोग्राफ फाइंडिंग्ज आर्थिक वर्ष 25–26’चे अनावरण केले आहे. हा अभ्यास देशभरातील दुधाच्या सेवनाच्या पद्धती, प्रसंग आणि प्रेरणा कशा बदलत आहेत याची निरीक्षणे नोंदवतो. हे संशोधन आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले असून दुधाचे दैनंदिन जीवनातील स्थान आणि नव्या जीवनशैलींनुसार होत असलेल्या बदलांचा मागोवा घेण्यात आला.

पश्चिम भारतातील निष्कर्ष देशातील इतर भागांपेक्षा वेगळा कल दाखवतात. फ्लेव्हर्ड मिल्क येथे रोजच्या दूध पिण्याच्या सवयीचा एक भाग बनले आहे. पश्चिम भागातील 81% प्रतिसादकर्त्यांनी ते “बहुतेक वेळा” फ्लेव्हर्ड मिल्क पितात असे सांगितले आणि हा आकडा भारतात सर्वाधिक आहे. इतर प्रदेशांमध्ये फ्लेव्हर्ड मिल्क विशिष्ट प्रसंगी (पूर्व), ऋतूनुसार (उत्तर) किंवा कम्फर्ट इंडल्जन्स (दक्षिण) नुसार प्यायले जाते; मात्र पश्चिम भारतात नॉस्टॅल्जिया किंवा आठवणींपेक्षा वेगळ्या प्रेरणेने चवीने आणि पसंतीमुळे दैनंदिन डेअरी सेवनाचा भाग म्हणून स्वीकारले जात आहे. पश्चिम भागामधील ग्राहक नव्या पिढीच्या एनर्जायझिंग स्वरूपातील पेयांकडेही सर्वाधिक आकर्षित असल्याचे दिसते: 62% प्रतिसादकर्ते एनर्जायझिंग ड्रिंक म्हणून प्रोटीन शेक्स निवडतात आणि आणखी 62% स्मूदीजना पसंती देतात. हे दोन्ही आकडे राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक आहेत. यासोबतच आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण वर्तन आढळले: पश्चिम भागामध्ये 59% लोक ते दुधाकडे जेवणासाठीचा झटपट पर्याय म्हणून बघतात. हा आकडा इतर प्रदेशांच्या तुलनेत फार पुढे आहे. त्यायोगे दुधाला सर्वाधिक पसंतीचे आणि फिटनेस-ओरिएंटेड जीवनशैलीत योग्य पोषण म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.

व्यापक पातळीवर पाहता, या अभ्यासात एक राष्ट्रीय प्रवाहही समोर येतो. पालक आपल्या मुलांच्या आहारातील दुधाच्या बदलत्या भूमिकेबद्दल अधिक सजग झाले आहेत. 54% पालकांना वाटते की त्यांच्या मुलांची वाढ त्यांच्या स्वतःच्या लहानपणीपेक्षा कमी आहे आणि 64% पालकांना दुधाचे सेवन कमी झाल्यामुळे हाडांची ताकद कमी होण्याची भीती वाटते. त्याच वेळी, प्रोटीनला महत्त्व प्राप्त होत आहे आणि 62% पालक दिवसभर ऊर्जा व प्रोटीनसाठी दुधावर अवलंबून आहेत.

या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मार्केटिंग प्रमुख शंतनू राज म्हणाले, “हा अभ्यास स्पष्टपणे दर्शवतो की दूध आपल्या जेवणातून निघून गेलेले नाही, ते फक्त वेगवेगळे  रूप बदलून येत आहे. या माहितीतून दुधाबाबत जपली गेलेली परंपरा आणि बदलते प्रवाह सगळे समोर येत आहे. 67% भारतीय अजूनही चहा या माध्यमातूनच दूध सर्वाधिक पितात. त्यातून दुधाशी जोडलेल्या आपल्या खोल सांस्कृतिक मुळांची पुष्टी होते; तर 44% लोक आता प्रोटीन शेक्सद्वारे दूध आपल्या दिवसाच्या आहारात आणतात. फिटनेस प्रणीत एका नव्या जीवनशैलीची ही रीत आहे. गोदरेज जर्सीसारख्या ब्रँडसाठी ही गोष्ट जबाबदारी आणि संधी असे दोन्ही आहे. ग्राहकांना चव, सोय आणि पोषण यापैकी कुठल्याही बाबतीत तडजोड करावी लागू नये हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे.”

पेयांपलीकडेही, डेअरी अजूनही देशभरातील घरांमध्ये मुख्य घटक म्हणून उपस्थित आहे. दही (80%), पनीर (76%) आणि बटर (74%) जेवणाचा आधार आहेत. लॅक्टोग्राफ आर्थिक वर्ष 25–26 निष्कर्षांसह, गोदरेज जर्सी विश्वसनीय गुणवत्ता, पोषण-केंद्रित नवकल्पना आणि बदलत्या जीवनशैलींसाठी डिझाइन केलेल्या उत्पादनांद्वारे दुग्धउत्पादनांच्या भविष्यात सकारात्मक बदल घडवण्याच्या बांधिलकीला पुन्हा मजबूत करते.