शिष्यवृत्ती परीक्षेत मोठा बदल : 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द – आता 22 फेब्रुवारीला होणार परीक्षा

By: Editor_Manas

On: Thursday, November 27, 2025 4:55 AM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात येत असून नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) तर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक CTET परीक्षेला बसणार असल्याने, त्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी तारीख जाहीर – 22 फेब्रुवारी 2026

राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नवीन तारीख 22 फेब्रुवारी 2026 निश्चित केली आहे.
या बदलाची नोंद विद्यार्थी, पालक, शाळा व परीक्षा केंद्रांनी घ्यावी, असे आवाहन परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

या निर्णयामुळे CTET आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांमध्ये होणारा वेळेचा ताण टळणार असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 4, 2026

July 3, 2026

July 3, 2026

July 3, 2026

June 30, 2026

June 30, 2026