एस्‍कॉर्ट्स कुबोटाकडून नवीन कुबोटा एमयू  4201 ट्रॅक्‍टर लाँच

एस्‍कॉर्ट्स कुबोटाने कुबोटा ब्रँडअंतर्गत नवीन ट्रॅक्‍टर ‘कुबोटा  एमयू  4201’च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या लाँचसह ब्रँडने भारतातील ४१-४४ एचपी श्रेणी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. कंपनीचे ट्रॅक्‍टर्सचे तीन ब्रँड आहेत, ते म्‍हणजे फार्मट्रॅक, पॉवर ट्रॅक आणि कुबोटा. नवीन कुबोटा ट्रॅक्‍टर विविधशेतीसंबंधितवापरांसाठीडिझाइनकरण्‍यात आलाआहे, ज्यामध्येमालवाहतूक देखील करता येते. हा ट्रॅक्‍टररोटाव्हेटर, डिस्कहॅरोइत्यादीअनेकअवजारांशीअत्यंतसुसंगतआहे.

जॅपनीज अभियंत्यांनी डिझाइन केलेल्‍या या नवीन ट्रॅक्‍टरमध्‍ये प्रीमियम वैशिष्‍ट्ये आहेत, जी ४५-५५ एचपी श्रेणीमधील विद्यमान कुबोटा ट्रॅक्‍टर्समध्‍ये उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये फ्लॅट डेक, सस्‍पेंडेड पेडल्‍स, बॅलन्‍सर शाफ्ट, सिन्‍क्रोमेश ट्रान्‍समिशन आणि ड्युअल क्‍लचचा समावेश आहे.

कंपनीने आपल्‍या कुबोटा    एमयू  4501 आणि कुबोटा  एमयू  5502 ट्रॅक्‍टर्सचे अपग्रेडेड व्‍हर्जन देखील लाँच केले आहे. या ट्रॅक्‍टर्समध्‍ये उच्‍च दर्जाचे जॅपनीज लिफ्ट तंत्रज्ञान नवीन ‘पोम्‍पा लिफ्ट’ची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामध्‍ये १६४० किलो ते २१०० किलो वजन उचलण्‍याची क्षमता आहे आणि या लिफ्टची उंची ४५५ मिमी आहे, जी श्रेणीमध्‍ये सर्वोत्तम आहे. 

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक निखिल नंदा म्‍हणाले, ”नवीन उत्‍पादन लाँचदेशांतर्गत ट्रॅक्‍टर बाजारपेठेत सर्वोत्तम कंपनी म्‍हणून आमचे स्‍थान प्रस्‍थापित करण्‍यासाठी आमच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. या नवीन उत्‍पादनांमध्‍ये आमच्‍या उत्‍पादन ऑफरिंग्‍जमधील अभियांत्रिकी उत्‍कृष्‍टता, अत्‍याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्‍च दर्जाची वैशिष्‍ट्ये आहेत. नवीन कुबोटा  एमयू  -4201 आणि कुबोटा  एमयू  -4501 व  एमयू  -5502 चे अपग्रेडेड व्‍हर्जन्‍स फार्मट्रॅक व पॉवरट्रॅक ब्रँडअंतर्गत आमच्‍या विद्यमान ऑफरिंग्‍जशी देखील पूरक आहेत. ही उत्‍पादने भारतातील ४१-५० एचपी बाजारपेठ विभागात आमचे स्‍थान अधिक दृढ करतील.”

आपले मत व्‍यक्‍त करत व्‍यवस्‍थापकीय संचालक अकिरा कॅटो म्‍हणाले, ”नवीन उत्‍पादनांनी भारतातील ४१-५० एचपी श्रेणीवर लक्ष्‍य केले आहे, जी आज एकूण देशांतर्गत बाजारपेठेत ६० ते ६४ टक्‍के योगदान देते. नवीन  एमयू  -4201ट्रॅक्‍टर मालवाहतूकीसह विविध कृषी उपयोजनांमध्‍ये प्रीमियम वैशिष्‍ट्यांचा शोध घेत असलेल्‍या शेतकऱ्यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.”

बाजारपेठ धोरणाबाबत सांगत ट्रॅक्‍टर बिझनेस डिव्हिजनचे सीओ जी. एस. ग्रेवाल म्‍हणाले, ”नवीन कुबोटा  एमयू  -4201ट्रॅक्‍टर ३५ एचपीवरून ४१-५० एचपी श्रेणीमध्‍ये अपग्रेड करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उच्‍च दर्जाचे उत्‍पादन आहे. आमची भारतात ट्रॅक्‍टर लाँच करण्‍याची आणि विशेषत: महाराष्‍ट्र, मध्‍यप्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्‍थान व हरियाणामधील आमची विद्यमान बाजारपेठ उपस्थिती अधिक दृढ करण्‍याची योजना आहे. तसेच अपग्रेडेड कुबोटा MU4501 व MU5502 मध्‍ये आता त्‍यांच्‍या विद्यमान प्रीमियम वैशिष्‍ट्यांसह दर्जात्‍मक हायड्रॉलिक लिफ्ट आहे.