पुणे, ऑक्टोबर 2025: दुचाकी आणि तीन चाकी वाहनांमधील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने (टीव्हीएसएम) महाराष्ट्रात त्यांची नवीन इलेक्ट्रिक दुचाकी – टीव्हीएस ऑर्बिटर लाँच करण्याची घोषणा केली. रोजचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून डिझाइन केलेल्या या टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये 158 किमी आयडीसी रेंज, क्रूझ कंट्रोल, 34-लीटर बूट स्पेस, हिल होल्ड असिस्ट आणि प्रगत कनेक्टेड फीचर्स अशा अनेक या सेगमेंटमधील फीचर्सचा प्रथमच समावेश केला आहे. तसेच या उद्योगातील प्रथमच 14” फ्रंट व्हीलसह, स्कूटर ₹94,900 (एक्स-शोरूम मुंबई, पीएम ई-ड्राइव्ह स्कीमसह) च्या आकर्षक किमतीत आरामदायी प्रवास, अनेक सुविधा देते.
कनेक्टेड मोबाइल ऍप, व्हिझरसह फ्रंट एलईडी हेडलॅम्प आणि इनकमिंग कॉल डिस्प्लेसह रंगीत एलसीडी क्लस्टर अशा प्रगत वैशिष्ट्यांचा टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांची सोय तर होतेच पण प्रवासाचा आनंद देखील मिळतो. त्याची 3.1 किलोवॅट प्रति तास बॅटरी आणि सुधारित एअरोडायनॅमिक कार्यक्षमता स्थिर, कार्यक्षम कामगिरीसह विस्तारित श्रेणी देते.
या लाँचबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष – प्रमुख कम्युटर आणि ईव्ही व्यवसाय तसेच कॉर्पोरेट ब्रँड आणि मीडिया प्रमुख श्री. अनिरुद्ध हलदर म्हणाले, “ईव्ही क्षेत्रात आमचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी तसेच विश्वास आणि नावीन्यपूर्णतेचा पाया भक्कम करत भारताच्या इलेक्ट्रिक प्रवासाला पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ग्राहकांच्या वाढत्या गरजांना अनुसरून, टीव्हीएस ऑर्बिटर महाराष्ट्रातील शहरी प्रवासाची पुनर्परिभाषा करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करते. प्रगत तंत्रज्ञान, वाढीव एअरोडायनॅमिक कार्यक्षमता, आराम आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्यांसह दैनंदिन व्यावहारिकतेचे संयोजन करते. टीव्हीएस ऑर्बिटर या सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे. यामुळे शाश्वत गतिशीलता सुलभ होईल.”
कार्यक्षमता आणि नियंत्रणासाठी तयार केलेले
3.1 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज, टीव्हीएस ऑर्बिटर 158 किमीची प्रभावी आयडीसी रेंज देते. त्याची वाढलेली एअरोडायनॅमिक कार्यक्षमता स्थिरता आणि ऊर्जा कार्यक्षमता दोन्हीही सुधारते. तर डायनॅमिक रीअर कॉन्फिगरेशनसह येत असलेले 14” फ्रंट व्हील शहरी वातावरणात अत्यंत सोयीचे ठरते. तसेच अचूक हाताळणी आणि आत्मविश्वासपूर्ण हालचाली सुनिश्चित करते. सरळ एर्गोनोमिक हँडलबार राइड डायनॅमिक्समध्ये आणखी सुधारणा करतो, आरामदायी प्रवास आणि सहज नियंत्रण प्रदान करतो.
डिझाइन तत्वज्ञान
टीव्हीएस ऑर्बिटरच्या रचनेत आधुनिक, आकर्षक आणि उद्देशपूर्ण डिझाइन तत्त्वज्ञानाचे अनुसरण करण्यात आले आहे, जे सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमता यांच्यात योग्य समन्वय साधते. 845 मिमी लांबीची फ्लॅटफॉर्म सीट रायडर आणि मागे बसणाऱ्या दोघांसाठीही आरामदायी आहे, तर 290 मिमी सरळ रेषेचा फूटबोर्ड पुरेशी लेग रूम प्रदान करतो. रुंद आणि सरळ हँडलबार एक एर्गोनॉमिक पोश्चर देतो, यामुळे राइड सहज होते. यात अंडर-सीट 34 लिटर स्टोरेजचा देखील समावेश आहे. ज्यामुळे यात दोन हेल्मेट सहजगत्या बसू शकतात.
तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी
टीव्हीएस ऑर्बिटर एक कनेक्टेड राइडिंग अनुभव देते, ज्यामध्ये याचा समावेश असतो:
- सक्रिय सुरक्षा: क्रॅश, पडणे, अँटी-थेफ्ट, जिओ-फेन्सिंग आणि टाइम-फेन्सिंग अलर्ट.
- सातत्यपूर्ण नियंत्रण: मोबाइल ऍपवर बॅटरी चार्ज आणि ओडोमीटर तपासण्याची संधी.
- स्मार्ट नेव्हिगेशन: कस्टमाइझ करण्यायोग्य सेटिंग्जसह प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन.
- कनेक्टेड रहा: एलसीडी डिजिटल क्लस्टरवर कॉल, एसएमएस आणि वैयक्तिक अलर्ट.
- रायडर कॉन्फिडन्स: हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट.
- नेहमीच अद्ययावत: सहज ओटीए अपडेट्स.
- ड्युअल मोड्स: रेंज आणि सुरक्षिततेसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह इको आणि पॉवर.
सुरक्षितता आणि हमी
टाइम फेंस, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग, नेव्हिगेट-टू-व्हेइकल, क्रॅश आणि फॉल अलर्ट, आपत्कालीन सूचना, जिओफेन्सिंग, अँटी-थेफ्ट आणि टोइंग अलर्ट यासारख्या कनेक्टेड वैशिष्ट्यांच्या प्रगत संचासह टीव्हीएस ऑर्बिटर सुरक्षिततेची पुनर्परिभाषा करते – जे खरोखरच राइडिंगचा उत्तम अनुभव सुनिश्चित करते. 169 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, एकात्मिक इंडिकेटरसह एलईडी हेडलॅम्प, एज-टू-एज कॉम्बिनेशन लॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि मजबूत बॉडी बॅलन्ससह, टीव्हीएस ऑर्बिटर प्रत्येक राइड आत्मविश्वासाने आणि खात्रीलायकरित्या प्रेरित करते.
व्हायब्रंट पॅलेट:
टीव्हीएस ऑर्बिटरमध्ये आकर्षक रंगांचा समावेश आहे – निऑन सनबर्स्ट, स्ट्रॅटोस ब्लू, लूनर ग्रे, स्टेलर सिल्व्हर, कॉस्मिक टायटॅनियम आणि मार्टियन कॉपर.
टीव्हीएस ऑर्बिटरची ठळक वैशिष्ट्ये | उद्योगात प्रथमच/सेगमेंटमध्ये प्रथम:
• आयडीसी रेंज: 158 किमी • 14” फ्रंट व्हील • क्रूझ कंट्रोल • 34-लिटर बूट स्पेस (दोन हेल्मेट ठेवण्याची क्षमता) • हिल होल्ड असिस्ट · जिओ-फेन्सिंग, टाइम फेन्सिंग, टोइंग, क्रॅश/फॉल अलर्ट यासारखी कनेक्टेड वैशिष्ट्ये
मुख्य वैशिष्ट्ये: • वाढीव एअरोडायनॅमिक कार्यक्षमता • कनेक्टेड मोबाइल ऍप • एकात्मिक निर्देशकांसह एज-टू-एज फ्रंट कॉम्बिनेशन लाइट्स • फ्रंट व्हिझरसह फ्रंट एलईडी हेडलॅम्प • इनकमिंग कॉल डिस्प्लेसह रंगीत एलसीडी कनेक्टेड क्लस्टर • सोप्या ऍक्सेस बॉक्ससह यूएसबी 2.0 चार्जिंग • 845 मिमी लांब फ्लॅटफॉर्म सीट आणि 169 मिमी ग्राउंड क्लिअरन्स · 290 मिमी स्ट्रेट-लाइन फूटबोर्ड |