ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंटने 2WD आणि 4WD सेगमेंटमध्ये विविध एचपी कॅटेगिरींमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च केले

मुंबई, ऑक्टोबर 2025 : ग्रोमॅक्स ॲग्री इक्विपमेंट लिमिटेड (पूर्वीचे महिंद्रा गुजरात ट्रॅक्टर लिमिटेड), जे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात सरकार यांच्यातील संयुक्त उद्यम आहे, यांनी 4WD आणि 2WD कॅटेगिरीमध्ये 8 नवे ट्रॅक्टर लॉन्च केले आहेत. यामध्ये भारतातील पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज (सब-50 HP सेगमेंट) समाविष्ट आहे.

ग्रोमॅक्सच्या दमदार आणि इंधन-कार्यक्षम डिझेल इंजिन्स तसेच जागतिक दर्जाच्या गिअरबॉक्स तंत्रज्ञानावर चालणारे हे नवे ट्रॅक्टर उच्च परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात आणि वापरण्यास सोपे आहेत. हे ट्रॅक्टर बागायती शेती, सुपारी शेती, इंटर-कल्टिव्हेशन, पडलिंग आणि हॉलज यांसारख्या विविध शेती गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

ट्रॅकस्टार कवच सिरीज अंतर्गत, ग्रोमॅक्सने सब-50 HP सेगमेंटमध्ये भारताची पहिली फॅक्टरी-फिटेड कॅबिन सिरीज सादर केली आहे. ही सिरीज शेतकऱ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि हवामान-प्रतिरोधक कार्यक्षेत्र उपलब्ध करून देते. या कॅबिनमुळे वर्षभर शेती कामे सुलभ होतात आणि उत्पादकता वाढते. कंपनी सुरुवातीला नॉन-एअर कंडिशन्ड व्हेरिएंट उपलब्ध करून देणार असून, पुढील टप्प्यात एअर कंडिशन्ड व्हेरिएंटही बाजारात आणला जाणार आहे.

या नव्या ट्रॅक्टरशिवाय, ग्रोमॅक्सने आपल्या सबसे सही चुनाव कॅम्पेनअंतर्गत दुसरा डीव्हीसीही (डिजिटल व्हिडिओ कमर्शियल) लॉन्च केला आहे. या नव्या मोहिमेत ग्रोमॅक्सची उत्पादने परफॉर्मन्स, उत्पादकता आणि नफा या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी परवडणारी आणि योग्य निवड असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

लॉन्चच्या वेळी बोलताना वीजय नाकरा – प्रेसिडेंट, फार्म इक्विपमेंट बिझनेस, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड म्हणाले,  “ग्रोमॅक्समध्ये आमचे ध्येय म्हणजे भारतीय शेतीच्या बदलत्या गरजांना अनुरूप, विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून मॅक्सिमम ग्रोथ साध्य करणे. एका दिवसात 8 नवे ट्रॅक्टर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो – प्रत्येक ट्रॅक्टर जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादनक्षमतेसाठी सक्षम बनवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. भारताचा पहिला सब-50 HP फॅक्टरी-फिटेड कॅबिन ट्रॅक्टर लॉन्च करून, ग्रोमॅक्स मूल्य, परफॉर्मन्स आणि परवडणारी किंमत यांचा आदर्श समतोल शोधणाऱ्या वाढत्या ग्राहकवर्गाची सेवा करत आहे. उत्सव काळात लॉन्च झाल्याने हे नवे ट्रॅक्टर ऑक्टोबर 2025 पासून ग्रोमॅक्स डिलरशिप्सवर उपलब्ध होणार आहेत.”

नवे ट्रॅक्टर संपूर्ण ग्रोमॅक्स ट्रॅक्टर डिलर्समार्फत उपलब्ध असतील. उत्सव काळात कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ग्रोमॅक्स डिलर्स विशेष ग्राहक योजना देत आहेत. यामध्ये प्रत्येक ट्रॅक्टर खरेदीवर आकर्षक योजना आणि हमखास गिफ्ट दिले जाणार आहे.

ग्रोमॅक्सचे नवे ट्रॅकस्टार ट्रॅक्टर्स – तपशील

  1. ट्रॅकस्टार कवच सिरीज : ही रेंज विशेषतः हॉलज आणि शेती कामांसाठी डिझाइन करण्यात आली असून AC आणि नॉन-AC कॅबिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये ट्रॅकस्टार 545 4WD आणि ट्रॅकस्टार 550 4WD सारखी मॉडेल्स समाविष्ट आहेत, जी विविध हवामान आणि परिस्थितींमध्ये आराम व उच्च परफॉर्मन्स देतात.
  2. ट्रॅकस्टार 525 4WD NT : खास 25 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, इंटर-कल्टिव्हेशनसाठी डिझाइन केलेले. यात 33’’ (2.75 फूट) ट्रॅक-विथ आहे, ज्यामुळे अरुंद ओळींमध्ये अधिक सुलभता आणि कार्यक्षमता मिळते.
  3. ट्रॅकस्टार 525 2WD : आणखी एक 25 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, बागायती शेतीसाठी तयार केलेले. हे ट्रॅक्टर सहज वापर आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रदान करते.
  4. ट्रॅकस्टार 540 HT : दमदार 40 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, हॉलज आणि पडलिंगसारखी अवघड कामे करण्यासाठी डिझाइन केलेले. हे टिकाऊपणा आणि शक्तिशाली परफॉर्मन्स सुनिश्चित करते.
  5. रॅकस्टार 540 ऑर्चर्ड : भारतातील पहिला 40 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर जो विशेषतः सुपारी (Areca-nut) शेतीसाठी विकसित करण्यात आला आहे. हे ट्रॅक्टर मल्टिफंक्शनल युटिलिटी फीचर्ससह येते, ज्यामुळे शेतीतील विविधता आणि उत्पादकता वाढते.
  6. ट्रॅकस्टार 545 4WD : एक बहुपयोगी 45 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, हॉलज, पडलिंग आणि विविध कृषी अनुप्रयोगांसाठी योग्य. हे विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेचे वचन देते.
  7. रॅकस्टार 550 4WD : एक शक्तिशाली 50 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, बटाटा शेती, पडलिंग आणि सर्वसमावेशक कृषी अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले. हे ताकद आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.
  8. रॅकस्टार 550 HT : आणखी एक इनोव्हेटिव्ह 50 HP कॅटेगिरी ट्रॅक्टर, हेवी-हॉलज आणि मल्टी-युटिलिटी शेती कामांसाठी डिझाइन केलेले. हे वाढीव उत्पादकता आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सुनिश्चित करते.