पुणे, सप्टेंबर 2025: बेअरिंग्ज, ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्स, कंडिशन मॉनिटरिंग आणि रोटेटिंग इक्विपमेंट सर्व्हिसेस यांसाठी भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञान आणि सुविधा पुरवठादार कंपन्यांपैकी एक एसकेएफ इंजिनिअरिंग अँड ल्युब्रिकेशन इंडिया प्रा. लि. ने दिव्य पुरोहित यांची ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्सचे भारत प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
नव्या भूमिकेत पुरोहित नाविन्यपूर्णता, उत्पादन, कामकाज उत्कृष्टता ग्राहक-केंद्रित मूल्य निर्मिती यावर लक्ष केंद्रित करून भारतातील एसकेएफच्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स व्यवसायाचे नेतृत्व करतील.
दक्षिण आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या प्रदेशांमध्ये दोन दशकांहून अधिक आंतरराष्ट्रीय नेतृत्व अनुभव असलेल्या पुरोहित यांना व्यवसाय विस्तार, शाश्वततेला चालना आणि औद्योगिक परिसंस्थेत चक्रीयता रुजविण्याचा सिद्ध अनुभव आहे. त्यांनी याआधी बुहलेर ग्रुपमध्ये दक्षिण आशियासाठी ग्रेन्स अँड फूड व्यवसाय प्रमुख आणि ॲटलास कॉर्पोमध्ये भारत व नेपाळसाठी बिझनेस लाईन मॅनेजर म्हणून काम केले असून, तिथे त्यांनी व्यवसाय विस्तार तसेच संघटनात्मक क्षमता मजबूत करण्याचे काम केले.
एसकेएफचे LLS इंडिया हेड दिव्य पुरोहित म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे आणि बंगळुरूमधील आमच्या जागतिक दर्जाच्या हरित उत्पादन केंद्राच्या बळावर भारतातील एसकेएफचे मजबूत ब्रँड स्थान आम्हाला या वाढीला पाठिंबा देण्यासाठी सक्षम बनवते. मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत आम्ही आमचे प्रगत ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स अधिक प्रमाणात स्थानिक स्तरावर तयार करण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ग्राहकांना जागतिक मापदंड पाळणाऱ्या पण स्थानिक पातळीवर उत्पादित प्रणालींचा लाभ होईल. आमचा भर ग्राहकांना सर्वोत्तम ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स देण्यावरच राहील आणि भारताच्या प्रगतीच्या चाकांना सुरळीत फिरविण्याची आमची भूमिका आम्ही व्यवस्थित पार पाडू.”
पुरोहित पुढे म्हणाले, “नाविन्यपूर्णतेची आस असलेला असा हा उद्योग आहे. माझी धारणा अगदी साधी सोपी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच एक अधिक चांगला मार्ग असतो. एसकेएफमध्ये, आमची वैविध्यपूर्ण आणि सहकार्यशील संस्कृती आधीपासूनच कल्पनांना सर्व स्तरांवर मुक्तपणे व्यक्त होण्यास आणि आकार घेण्यास प्रोत्साहित करते. माझे ध्येय हे ही उत्सुकता, सहकार्य, काळजी आणि धैर्य या संस्कृतीला अधिक बळकट करणे आहे. त्यायोगे आपण वेगवेगळ्या विभागात आपल्या ग्राहकांसाठी विश्वासार्ह भागीदार बनून राहत एकत्रपणे कामकाज उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि दीर्घकालीन मूल्य साध्य करू.”
पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली, एसकेएफ ल्युब्रिकेशन नाविन्यपूर्णता वाढविण्यावर आणि कल्पनांना प्रभावी सोल्यूशन्समध्ये परिवर्तित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. मेक इन इंडिया उपक्रमाशी सुसंगत एसकेएफ स्थानिक स्तरावर अधिक प्रमाणात प्रगत ल्युब्रिकेशन सोल्यूशन्स करण्यास कटिबद्ध आहे. त्यातून जागतिक कौशल्य आणि स्थानिक क्षमता यांचा संगम होईल. कामकाज उत्कृष्टता डिजिटलायझेशन, एआय आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीद्वारे साधली जाईल, तर ग्राहक-केंद्रितता मजबूत सेवा नेटवर्क्स आणि स्थानिक उत्पादन वाढवून कायम राखली जाईल. चक्रीयतेतून शाश्वतता हा आमच्या धोरणाचा मूलभूत पाया राहील. त्यामुळे आम्ही तयार केलेले प्रत्येक सोल्यूशन ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करेल आणि पर्यावरणीय परिणाम कमी करेल.
भारताचे उत्पादन उद्योगक्षेत्र उच्च-वाढ टप्प्यात प्रवेश करत असताना पुरोहित यांची नियुक्ती एसकेएफच्या केवळ सेवा देण्याच्या नव्हे, तर भारतातील औद्योगिक सेवासुविधांच्या भविष्यास आकार देण्याच्या बांधिलकीलाही अधोरेखित करते.
एसकेएफचा ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्स व्यवसाय 360 वर्षांपेक्षा अधिक संयुक्त अनुभव असलेल्या Lincoln, RecondOil, Alemite, Mityvac आणि JSG यांसारख्या कंपन्यांच्या अधिग्रहणाद्वारे मजबूत झालेल्या समृद्ध जागतिक परंपरेवर आधारित आहे. या पायावर एसकेएफने अशा ल्युब्रिकेशन तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेतली आहे ज्यामुळे बेअरिंगचे आयुष्य वाढते, मशिनरीची विश्वसनीयता सुधारते आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढते. आज हा व्यवसाय डिजिटलायझेशन आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीसह या वारशाचे एकत्रीकरण करतो आणि उद्योगांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून आपली भूमिका पुन्हा दृढ करतो.
प्रभावी ल्युब्रिकेशन हे मशिनरीच्या विश्वसनीय कामगिरीसाठी आणि बेअरिंगच्या दीर्घायुष्यासाठी अत्यावश्यक आहे. एसकेएफचे प्रगत ल्युब्रिकेशन लाइफटाइम सोल्यूशन्स विश्वासार्हतेच्या 5+1R तत्त्वावर आधारित आहेत: योग्य ल्युब्रिकंट, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य कनेक्टिव्हिटीसह पुरवणे. हा सिद्ध झालेली चौकट घर्षण कमी करते आणि उत्पादनक्षमता वाढवते. त्यामुळे ग्राहकांना मन:शांती मिळते.
मॅन्युअल ल्युब्रिकेशन सिस्टीमपासून पूर्णपणे ऑटोमॅटिक ल्युब्रिकेशन सिस्टीमपर्यंत विस्तृत श्रेणीसह एसकेएफ सतत, प्रदूषणमुक्त ल्युब्रिकेशन सक्षम करत आहे. त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमता सुधारते, देखभाल खर्च कमी होतो आणि अपटाईम वाढतो.
ल्युब्रिकेशनला कंडिशन मॉनिटरिंग आणि अचूक देखभाल पद्धती यांसह एकत्रित करून एसकेएफ केवळ महत्त्वपूर्ण मालमत्तांचे संरक्षणच करत नाही तर उत्पादनक्षमता, सुरक्षा आणि एकूणच मालकी खर्चामध्ये मोजण्याजोग्या सुधारणाही देते.





