बीएसएनएलने सुरु केले इंटेलिजंट स्वदेशी ४जी नेटवर्क, २६,७०० आणखी गावे जोडली जातील

मुंबई, सप्टेंबर, २०२५:  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) (बीएसई:५३२५४०, एनएसई: TCS), भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) आणि तेजस नेटवर्क्स लिमिटेडने (बीएसई: ५४०५९५, एनएसई:TEJASNET) एकत्र येऊन भारत टेलिकॉम स्टॅकची सुरुवात केली आहे. हे पूर्णपणे भारतात डिझाईन आणि विकसित केलेले एक आधुनिक, सुरक्षित सोल्युशन आहे. हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटली कनेक्टेड आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाने प्रेरित आहे.

या लॉन्चमुळे भारत जगातील पाचवा असा देश बनला आहे, ज्याने ४जी आणि त्याच्या भविष्यासाठी एक आत्मनिर्भर, स्वदेशी  टेलिकॉम टेक्नॉलॉजी स्टॅक तयार केला आहे. एक मिशन मोड कार्यक्रम म्हणून टीसीएसने डेटा सेंटर स्थापन केले आहे, सी-डॉटचे ईपीसी कोर ऍप्लिकेशन, तेजसची बेस स्टेशन्स आणि १००,००० पेक्षा जास्त साईट्सवर रेडिओ मूलभूत सेवासुविधा सुरु केल्या आहेत. २४/७ रिअल टाइम नेटवर्क व्यवस्थापनासाठी टीसीएसच्या कॉग्निटिव्ह नेटवर्क ऑपरेशन्स (TCS CNOPSTM) प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊन कार्यान्वयनाचे नेतृत्व केले आहे.

हे साध्य करण्यासाठी व्यापक अभियांत्रिकी कौशल्य आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीदारांमधील अखंड सहकार्य आवश्यक आहे. हा प्रकल्प टीसीएस, बीएसएनएल, दूरसंचार विभाग, अ‍ॅक्टिव्ह मॅककिन्से अँड कंपनी, सी-डॉट, तेजस, आय अँड सी पार्टनर्स आणि इतरांद्वारे मिशन मोडमध्ये राबविला जात आहे.

हे प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण झाले, ज्यामुळे ते बीएसएनएलच्या विद्यमान २ जी/३ जी नेटवर्क पायाभूत सुविधांमध्ये पूर्ण इंटिग्रेशनसह सर्वात जलद ४ जी नेटवर्क तैनातींपैकी एक बनले. हे रोलआउट भारताची राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करते आणि ऑनलाइन शिक्षण, नागरिक सेवा, टेलिमेडिसिन, ई-गव्हर्नन्स यांना फक्त एका बटणाच्या टॅपवर अधिक सुलभ उपलब्ध करून देऊन भारतातील शहरी आणि ग्रामीण भागात समान पोहोच सुनिश्चित करते.

बीएसएनएलचे सीएमडी ए रॉबर्ट जे रवी म्हणाले, “आज आपण देशासाठी अभिमानास्पद अशी एक मोठी कामगिरी साजरी करत आहोत. टीसीएस, तेजस नेटवर्क्स आणि सी-डॉट यांच्या सहकार्याने तयार केलेले आमच्या स्वदेशी ४जी नेटवर्कचा देशभरात प्रसार हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे. टीम बीएसएनएलच्या अथक प्रयत्नांमधून तयार केलेले हे ‘मेड इन भारत’ स्टॅक आपले डिजिटल भविष्य सुरक्षित करते आणि कनेक्टिव्हिटीचे फायदे देऊन प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवते, डिजिटल दरी पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात भरून काढते.”

बीएसएनएलचे संचालक (ग्राहक गतिशीलता – सीएम) श्री संदीप गोविल म्हणाले, “आमच्या ग्राहकांना आता कनेक्टिव्हिटीचा एक नवीन मानक अनुभवायला मिळेल. हा अनुभव पूर्णपणे आपल्या स्वतःच्या नेटवर्कद्वारे दिला जाईल. हा स्वदेशी ४जी तंत्रज्ञान सी-डॉट, तेजस, टीसीएस आणि बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. हे उत्कृष्टता आणि स्केलेबिलिटीसाठी डिझाइन केलेले आहे. हा डिजिटल समावेशक समाज उभारण्याचा आधारस्तंभ आहे, जो ५जी आणि त्याहूनही पुढे विकसित होण्यासाठी तयार आहे. यामुळे हे सुनिश्चित होते की भारताची विकास गाथा सार्वभौम, स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे.”

टीसीएसचे टेलिकॉम स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्जचे सल्लागार आणि तेजस नेटवर्क्सचे अध्यक्ष एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले, “आम्हाला अभिमान आहे की आम्ही जगातील अशा मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश केला आहे ज्यांनी व्यापक, विश्वासार्ह आणि सॉफ्टवेअर-अपग्रेडेबल टेलिकॉम टेक्नॉलॉजी स्टॅक विकसित केला आहे. बीएसएनएलमधील यशस्वी तैनाती ऐतिहासिक आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात शक्तिशाली डेटा आणि व्हॉइस नेटवर्कचे फायदे पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल आकांक्षांना सतत पाठिंबा देण्यासाठी टीसीएसची वचनबद्धता पुन्हा एकदा दर्शवते. 3GPP मानकांचे पालन करून तयार केलेले, हे स्टॅक भारताच्या मानकांमध्ये पुढील योगदानाचा पाया रचते.”

जवळजवळ सहा दशकांपासून, टीसीएसने भारताच्या तांत्रिक क्रांतीला चालना देण्यात, असंख्य राष्ट्र-निर्माण कार्यक्रम राबविण्यात, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आणि लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातील आघाडीच्या स्टॉक एक्सचेंज आणि वित्तीय संस्थांचे आधुनिकीकरण करण्यापासून ते संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी पासपोर्ट जारी करणे, आरोग्य विमा आणि पेन्शन प्रणाली सुधारण्यापर्यंत, टीसीएस देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उच्च-प्रभावी, नागरिक-केंद्रित सेवा आणत आहे.