ओबेन इलेक्ट्रिक (Oben Electric) या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १० नवीन शोरूमसह आपली उपस्थिती वाढवणार 

पुणे, १६ सप्टेंबर २०२५: भारतातील देशांतर्गत निर्मित, संशोधन आणि विकास-चालित इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक ओबेन इलेक्ट्रिकने या आर्थिक वर्षात १० नवीन शोरूम आणि सर्व्हिस सेंटर्सचे उद्घाटन करून, महाराष्ट्रात आपला व्यवसाय विस्तारण्याची योजना जाहीर केली.  राज्यातील दैनंदिन प्रवाशांमध्ये वेगाने लोकप्रिय होत असलेल्या रॉर ईझी सिग्मा (Rorr EZ Sigma) या त्यांच्या नवीनतम मॉडेलला बाजारपेठेतील जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर, हे पाऊल उचलण्यात आले आहे. ५ शोरूम आधीच कार्यरत असल्याने, ओबेन इलेक्ट्रिक, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये एक मजबूत नेटवर्क स्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

  • पुण्यातील ४ शोरूमच्या समावेशासह, ५ शोरूमसह आधीच मजबूत उपस्थिती वाढवली आहे.
  • रॉर ईझी सिग्माच्या लाँचमुळे, राज्यात इलेक्ट्रिक प्रवासी मोटारसायकलींची मागणी वाढली आहे.

पुण्यात, कंपनीने वाकड, शिवाजीनगर, धनकवडी आणि चिंचवड येथे चार शोरूमसह आधीच लक्षणीय प्रवेश केला आहे, जो शहरातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जोरदार स्वीकारास अधोरेखित करतो. पुण्याच्या पलीकडे, ओबेन इलेक्ट्रिक जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे एक शोरूम चालवते, जे राज्यभरात सुलभ आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्ससाठीची त्यांची वचनबद्धता अधिक दृढ करते.

शिवाजीनगर येथील शोरूममध्ये रॉर ईझी सिग्मावरील एका मीडिया सत्रात बोलताना ओबेन इलेक्ट्रिकचे विक्री आणि नेटवर्क विकास उपाध्यक्ष, श्री. हर्षवर्धन देशमुख म्हणाले, “नवीन युगातील गतिशीलता स्वीकारण्यात महाराष्ट्र हे, नेहमीच एक ट्रेंड सुरु करणारे राज्य राहिले आहे, या संक्रमणात पुणे आघाडीवर आहे. आमच्या नियोजित विस्तारासह, आम्ही आमच्या बेस्ट-इन-क्लास इलेक्ट्रिक प्रवासी मोटारसायकली राज्यभरातील ग्राहकांच्या जवळ पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवतो. रॉर ईझी सिग्माला मिळालेला जोरदार प्रतिसाद आमच्या तंत्रज्ञानावर आणि विक्रीनंतरच्या सेवेवर रायडर्सचा विश्वास दर्शवतो, ज्यामुळे ओबेन इलेक्ट्रिकची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.”

₹१.२९ लाख पासून सुरू होणाऱ्या सुरुवातीच्या किंमतीसह, रॉर ईझी सिग्मा चांगली कामगिरी, आराम आणि दैनंदिन वापरासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड या बाबींने सुसज्ज आहे.  ३.४ किलोवॅट-तास आणि ४.४ किलोवॅट-तास प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली रॉर ईझी सिग्मा १७५ किमी पर्यंतची रेंज, तीन राइड मोड (इको, सिटी, हॅवॉक) आणि ९५ किमी/ताशी कमाल वेग देते. ओबेनच्या पेटंट केलेल्या एलएफपी बॅटरीद्वारे सहाय्यित असलेली रॉर ईझी सिग्मा वेगवेगळ्या हवामानांत विश्वसनीय कामगिरीसाठी ५०% जास्त उष्णता प्रतिरोधकता आणि दुप्पट जीवनचक्र सुनिश्चित करते. तिच्या वैशिष्ट्यांमध्ये शहरामध्ये आरामासाठी रिव्हर्स मोड, नेव्हिगेशन आणि स्मार्ट अलर्टसह ५-इंचाचा टीएफटी डिस्प्ले, एर्गोनॉमिक सीट आणि नवीन इलेक्ट्रिक रेड कलर यांचा समावेश आहे. बुकिंग ₹२,९९९ पासून सुरू झाली असून, ती, अमेझॉन वर देखील उपलब्ध आहे.

सणासुदीच्या हंगामाचे औचित्य साधून, ओबेन इलेक्ट्रिक, ग्राहकांना रॉर ईझी सिग्मा आणि तिच्या पूर्ववर्ती रॉर ईझीवर आकर्षक फायदे देत आहे. यामध्ये लाँच किंमतीमध्ये आधीच समाविष्ट केलेला ₹२०,००० चा किंमत लाभ, ₹१०,००० पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि प्रत्येक खरेदीवर एक मोफत सोन्याचे नाणे समाविष्ट आहे. या उत्साहात भर घालत, एका भाग्यवान ग्राहकाला आयफोन जिंकण्याची संधी देखील मिळते.

कस्टमर-फर्स्ट तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, ओबेन इलेक्ट्रिकने २४/७ ग्राहक सहाय्य आणि जलद सेवा निराकरण सादर केले आहे, जे ७२ तासांच्या आत ९०% निराकरण दर प्रदान करते. प्रत्येक शोरूममध्ये प्लॅटिनम-सर्टिफाइड तंत्रज्ञ असलेले ओबेन केअर सर्व्हिस सेंटर आहे, जे संपूर्ण इन-हाऊस विकसित बॅटरी, मोटर्स आणि व्हेईकल कंट्रोल युनिटसाठी जलद आणि तज्ञ सेवा सुनिश्चित करते.

महाराष्ट्राच्या बाहेर, ओबेन इलेक्ट्रिकने कर्नाटक, दिल्ली, जयपूर, अमृतसर, हैदराबाद, कोची आणि लखनऊसह भारतभरात ५० हून शोरूम स्थापन केले आहेत आणि ती, या आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशभरात ही संख्या १५० हून अधिक शोरूम आणि सर्व्हिस सेंटर्सपर्यंत वाढवण्याच्या मार्गावर आहे.