आयआयएम मुंबईमध्ये गोदरेज डीईआय लॅबचा अनोखा उपक्रम

मुंबई, 15 सप्टेंबर 2025: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा विविधता आणि सर्वसमावेशकता उपक्रम असलेल्या गोदरेज डीईआय लॅबने गेल्या आठवड्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-मुंबई (आयआयएम-मुंबई) येथे इंडिया इनक्लुडेड ऑन कॅम्पस या केस स्टडी स्पर्धेचा तिसरा टप्पा आयोजित केला होता. या उपक्रमांतर्गत गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप रोजच्या जगण्यात विविधता, समता आणि सर्वसमावेशकते (डीईआय) संबंधीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आजचे विद्यार्थी किती तयार आहेत हे जाणून घेण्यासाठी टॉप बी-स्कूलमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. तसेच डीईआयचा विस्तृत विचार करणारे भविष्यातील नेतृत्व ओळखते.

अधिकाधिक महिलांना संधी देणे आणि त्या दीर्घकाळ कामावर टिकून राहतील यासाठी प्रयत्न करणे या कॉर्पोरेट इंडियामधील महत्त्वाच्या प्राधान्यांपैकी एकावर इंडिया इनक्लुडेड ऑन कॅम्पस हा उपक्रम लक्ष केंद्रित करतो. या केस स्टडी चॅलेंजअंतर्गत, विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणे अपेक्षित आहे. तसेच महिलांचे प्रतिनिधित्व वाढवून  कामाच्या जागा या अधिक संतुलित आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी नावीन्यपूर्ण आणि कृतीशील धोरणे मांडणे अपेक्षित आहे.

या उपक्रमाबद्दल गोदरेज डीईआय लॅबचे प्रमुख आणि क्विरिस्तानचे लेखक परमेश शहानी म्हणाले, “भारताची खऱ्या अर्थाने भरभराट करायची असेल तर सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे. तसेच ज्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात असे वाटते, त्यासाठी प्रयत्न करणे. विकास आणि नवोपक्रमाचा हाच मुख्य गाभा असायला हवा. या नवीन विचारासह तिसऱ्या आवृत्तीत आयआयएम मुंबईच्या विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी अधिक महिलांना कशी संधी दिली जाईल, त्यांना कसे टिकवून ठेवता येईल आणि सक्षम करता येईल याबद्दल विचार करण्यास आम्ही प्रोत्साहित करत आहोत. या उपक्रमाचे ध्येय हे केवळ आजच्या आव्हानांचे निराकरण करणे एवढेच नाही तर सर्वसमावेशकता ही नेतृत्वाचा अविभाज्य घटक आहे असे मानणाऱ्या नेत्यांची पिढी तयार करणे, हे आहे.”

गेल्या आठवड्यात आयआयएम त्रिची येथे या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर एसआयबीएम पुणे आणि आयआयएम मुंबई येथे देखील त्याचा टप्पा पार पडला. तर आयआयएम लखनऊ येथे या स्पर्धेचा समारोप झाला. अंतिम फेरीतील चार स्पर्धक 8 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील मुख्यालयात गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पॅनेलसमोर त्यांचे प्रस्ताव सादर करतील. यात विजेत्या संघाला 100,000 रुपये रोख बक्षीस आणि ग्रुपसोबत शिकवण्याची संधी मिळेल.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची अंतर्गत तसेच बाहेरील सर्वसमावेशक परिसंस्था भक्कम करण्याच्या डीएनएशी जोडलेले राहत गोदरेज डीईआय लॅब या उपक्रमाद्वारे, भविष्यातील नेत्यांची निर्णय प्रक्रिया अधिक परिपक्व करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे देशभरातील उद्योजकतेमध्ये बदल होईल.