चेन्नई, 15 सप्टेंबर 2025: भारतातील आघाडीची किरकोळ आरोग्य विमा कंपनी, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ‘नो युवर पॉलिसी’ उपक्रमास सुरुवात केली आहे. हे एक नवीन इन-ऍप वैशिष्ट्य आहे जे ग्राहकांना आरोग्य विमा कव्हर समजण्यास सोपे आणि सुलभ करण्यासाठी डिझाइन केले आहे. IRDAI च्या आवश्यक ग्राहक माहिती पत्रकाशी (CIS) आणि व्यापक ग्राहक संरक्षण उद्दिष्टांशी सुसंगत आहे. स्टार हेल्थ CIS च्या सरलीकृत आवृत्तीसारखे उपक्रम उद्योगासाठी एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवतात.
स्टार हेल्थच्या कस्टमर ऍपवर उपलब्ध असलेले हे मॉड्यूल मुद्देसूद, समजण्यास सोपे असे पॉलिसीत असलेले, वगळलेले आणि लागू प्रतीक्षा कालावधीबाबतची माहिती संक्षिप्त स्वरूपात देते. पॉलिसीच्या अटी आणि शर्ती समजून घेणे ग्राहकांना कठीण जाते असे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळेच त्यांना पॉलिसीतून वगळलेल्या गोष्टी आणि प्रतीक्षा कालावधीबद्दल तसेच कव्हरेज तपशील स्पष्ट करण्यासाठी ग्राहक सेवा किंवा एजंटवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळेच ‘तुमची पॉलिसी जाणून घ्या’ हा उपक्रम सुरू केल्यापासून 3,00,000 ग्राहकांना फायदा झाला आहे. याचा उद्देश त्वरित, व्यवस्थित माहिती पुरवण्यासोबतच अधिक माहितीपूर्ण आणि सक्रिय ग्राहक सहभाग वाढवणे हा आहे.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. आनंद रॉय म्हणाले, “स्टार हेल्थचा “नो युवर पॉलिसी” हा उपक्रम म्हणजे विमा अटी अधिक ग्राहक अनुकूल बनवण्याच्या दिशेने आमचा प्रयत्न आहे. सीआयएसची एक सरलीकृत, सुलभ आवृत्ती तयार करून, आम्ही नियमांच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना ते नेमके काय घेत आहेत, हे सांगणार आहोत. ते ग्राहकांना समजावून देणार आहोत. ग्राहकांना वापरायला साधे, सोपे, सहज असे हे तयार करण्यात आले आहे. आमच्या ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी तसेच विम्याची थेट माहिती मिळवण्यासाठी, हा उपक्रम फारच सोयीचा आहे. ज्या स्वरूपात ही माहिती वापरायची आहे त्याच स्वरूपात सगळी माहिती ग्राहकांना उपलब्ध होते. हे केवळ माहितीबद्दल नाही, तर ग्राहकांना सर्वाधिक गरज असताना माहितीची स्पष्टता देण्याबद्दल आहे. त्यामुळेच जेव्हा एखाद्या ग्राहकाला दावा दाखल करण्याची, रुग्णालयात भेट देण्याची किंवा सह-पेमेंटची तपासणी करण्याची गरज भासते, तेव्हा ते या माध्यमातून सहज माहिती मिळवू शकतात.”
हा उपक्रम दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे:
- कशाचा समावेश : हॉस्पिटलायझेशन, आपत्कालीन काळजी, प्रसूती आणि लहान मुलांच्या आजाराचे कव्हरेज यासारख्या प्रमुख पॉलिसी फायद्यांचा थोडक्यात आढावा. तसेच ग्राहकाने निवडलेल्या कोणत्याही बोनस वैशिष्ट्यांचा आणि ऍड-ऑन कव्हरची माहिती.
- काय समाविष्ट नाही: कॉस्मेटिक उपचार, लिंग बदल प्रक्रिया, मादक पदार्थांच्या गैरवापराशी संबंधित उपचार आणि वाढत्या वजनाचे व्यवस्थापन अशा नेहमीच्याच गोष्टी. काही ठरावीक आजार आणि विमा काढण्यापूर्वीच झालेल्या आजारासाठीचा (PED) प्रतीक्षा कालावधी देखील हायलाइट करते, ज्यामुळे ग्राहकांना दावे निकाली काढताना धक्के बसत नाहीत.
याचे काम कसे चालते :
स्टार हेल्थ ऍपच्या माय पॉलिसी विभागात जाऊन फक्त काही क्लिकमध्ये ग्राहक सर्व माहिती मिळवू शकतात.
विमा पॉलिसीत कशाचा समावेश नाही आणि प्रतीक्षा कालावधी याबद्दल ग्राहकांशी सक्रिय संवाद साधल्यानंतर स्टार हेल्थ इन्शुरन्सला येणारे ग्राहकांचे फोन कमा झाले आहेत. जे ग्राहकांचे समाधान तर करतेच पण त्यांना तयारी करण्यासाठी असे उपक्रम किती महत्त्वाचे आहेत हे देखील दाखवून देते.
‘नो युअर पॉलिसी’ची अंमलबजावणी ही स्टार हेल्थच्या विस्तृत डिजिटल धोरणाचा एक भाग आहे, जी अजूनही उत्तम परिणाम देते आहे. स्टार हेल्थ ऍपने 11 दशलक्ष डाउनलोड्सचा आकडा ओलांडला आहे, तर मासिक सक्रिय वापरकर्ते 1.2 दशलक्षांहून अधिक आहेत. आजघडीला 63% नूतनीकरण स्वयंचलितपणे केली जातात. तर 75% पेक्षा जास्त नवीन व्यवसाय आता डिजिटल चॅनेलद्वारे येतात, जे ग्राहकांना स्वयंपूर्ण करणाऱ्या साधनांसाठी वाढती पसंती दर्शवते.
“नो युअर पॉलिसी” या विभागात ग्राहक सरासरी 2 मिनिटे थांबतात. डिजिटल-फर्स्ट अनुभवांवर सातत्याने लक्ष केंद्रित केल्यामुळे या ऍपला ग्राहकांचे चांगले रेटिंग मिळते आहे. ऍप स्टोअरवर 4.6 तर गुगल प्लेवर 4.4.