पुणे, ०६ जून,२०२६ : ‘स्नीकर’ ब्रँड ‘स्टेट ऑफ जॉय’ ने आपली उत्पादने अधिकृतपणे देशभर सादर केली आहेत. देशातील पादत्राणांच्या बदलत्या बाजारपेठेत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक पुल्लेला गोपालकृष्ण बाची आणि दासरी राजू रमेश यांनी या ब्रँडची स्थापना केली आहे. आराम आणि अभिव्यक्ती यांचा मेळ घालणाऱ्या रचनात्मकदृष्ट्या डिझाइन केलेल्या ‘स्नीकर्स’च्या माध्यमातून दैनंदिन पादत्राणांची व्याख्या नव्याने बदलणे हे या ब्रँडचे उद्दिष्ट आहे.
उत्कृष्ट पादत्राणे पायाच्या नैसर्गिक आकाराला आणि हालचालीला पूरक असायला हवीत, या विश्वासावर आधारित ‘स्टेट ऑफ जॉय’च्या उत्पादनांची रचना ‘अॅनाटॉमी-फर्स्ट’ (पायांच्या रचनेला प्राधान्य देणाऱ्या) दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. आजच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशा समकालीन सौंदर्याचा सांभाळ करीत, संपूर्ण दिवसभराचा आराम, आधार आणि वापर सुलभतेला या ब्रँडचे ‘स्नीकर’ प्राधान्य देतात.
‘स्टेट ऑफ जॉय’ हा केवळ पादत्राणांचा ब्रँड नसून, तो ‘जॉय सबकल्चर’ नावाची व्यवस्था उभारत आहे. ही एक ‘कम्युनिटी-ड्रिव्हन’ चळवळ असून, ती वैयक्तिक वैशिष्ट्ये, सर्जनशीलता आणि अस्सल अभिव्यक्तीचा उत्सव साजरा करते. कलाकार, स्वप्ने पाहणारे आणि स्वतंत्र विचारवंतांकडून प्रेरणा घेऊन लोकांनी आपापल्या परीने आनंदाचा स्वीकार करावा अशी संस्कृती निर्माण करण्याचा या ब्रँडचा प्रयत्न आहे.
देशभरातील ८०० हून अधिक प्रीमियम रिटेल स्टोअर्स आणि ३,००० हून अधिक मल्टी-ब्रँड स्टोअर्समधील उपस्थितीसह, ‘स्टेट ऑफ जॉय’मजबूत ‘ओम्नीचॅनेल’ धोरणाद्वारे भारतात आपला विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. भविष्यातील वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशा अपेक्षेने हा ब्रँड आपल्या ‘एक्सक्लुझिव्ह ब्रँड आउटलेट्स’मध्येही गुंतवणूक करीत आहे; तसेच प्रमुख रिटेल नेटवर्क्समधील आपली उपस्थिती सातत्याने मजबूत करत आहे.
या प्रसंगी बोलताना “स्टेट ऑफ जॉय’चे संस्थापक पुल्लेला गोपालकृष्ण बाची म्हणाले, की ‘पादत्राणे जितकी दिसायला सुंदर असतात, तितकीच ती घालतानाही सुखावह वाटली पाहिजेत, या साध्या विश्वासातून ‘स्टेट ऑफ जॉय’ची निर्मिती झाली आहे. आमच्या रचनात्मकदृष्ट्या डिझाइन केलेल्या शूजच्या माध्यमातून, लोकांच्या नैसर्गिक हालचालींना पूरक ठरेल असा आराम देण्यावर आमचा भर आहे. त्याच वेळी अस्सलपणा, व्यक्तिमत्त्व आणि आनंद साजरा करणारा ब्रँड निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. संपूर्ण भारतात लाँच होत असताना, आधुनिक भारताचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि चैतन्य प्रतिबिंबित करणारा एक समुदाय निर्माण करण्यासाठी आम्ही कमालीचे उत्सुक आहोत.”





