पुण्यात एटीएम फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; अंत्यविधीसाठी गेलेल्या मुलाकडून १ लाखांची चोरी

By: Editor_Manas

On: Monday, May 11, 2026 3:25 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : पुण्यातील खडकी परिसरात एटीएम फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात आजोबांच्या निधनाचे दु:ख असताना अंत्यविधीसाठी पैसे काढायला गेलेल्या नातवाची फसवणूक करून चोरट्याने त्याच्या खात्यातून तब्बल एक लाख रुपये काढून घेतले. औंध रस्ता परिसरात रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला औंध रस्ता परिसरातील एका सोसायटीत राहतात. रविवारी सकाळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अंत्यविधीसाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्या मुलाला एटीएम कार्ड देऊन पैसे काढण्यासाठी पाठवले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलगा औंध रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम केंद्रात गेला. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने मदतीचा बहाणा करत त्याच्याशी संवाद साधला. घरातील दुःखामुळे मुलगा गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात येताच चोरट्याने त्याच्याकडून एटीएम कार्ड आणि पासवर्डची माहिती मिळवली.

यानंतर “एटीएममधून पैसे निघत नाहीत” असा बहाणा करून चोरट्याने कार्ड स्वतःकडे ठेवले आणि मुलाच्या हातात दुसरेच कार्ड देत तेथून पसार झाला. काही वेळानंतर फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढल्याचे संदेश येऊ लागले. चोरट्याने प्रत्येकी २० हजार रुपयांचे व्यवहार करत एकूण एक लाख रुपये काढून घेतल्याचे समोर आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित एटीएम केंद्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये. आपला एटीएम पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नये. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी पैसे काढताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026