अहमदाबाद, ३० एप्रिल २०२६: मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (एमएफआरएल) भारतातील अधिकृत फॉर्म्युला १® कार्यक्रमासाठी स्टार खेळाडू श्रेयस अय्यरची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. मुंबई फाल्कन्सला अधिकृत फॉर्म्युला १® मान्यताप्राप्त सिम रेसिंग स्पर्धा आयोजित करण्याचे हक्क देणाऱ्या करारांतर्गत एफ१® सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६ ही स्पर्धा देशभरातील उदयोन्मुख प्रतिभेसाठी एक राष्ट्रीय स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. ही नियुक्ती विविध क्रीडा प्रकारांमध्ये क्रीडा संस्कृती आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या मुंबई फाल्कन्सच्या दृष्टिकोनाला सादर करते.
श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेटमधील सर्वात सातत्यपूर्ण मॅच-विनर आणि सर्व फॉरमॅट्समधील एक यशस्वी नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. मैदानाबाहेरही त्याचा तरुण पिढीवर मोठा प्रभाव असून, त्याचे चाहते केवळ पारंपारिक क्रिकेट प्रेमींपुरते मर्यादित नाहीत. त्याची क्षमता आणि कर्तृत्व हे उच्च कामगिरी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि भारतातील डिजिटल युगातील क्रीडा पिढीशी थेट संबंध दर्शवते, ज्यामुळे तो या चॅम्पियनशिपसाठी एक योग्य चेहरा ठरला आहे.
“खेळ हा नेहमीच स्वतःची क्षमता ओळखणे आणि त्यावर कार्य करण्यासाठी पुरेशी शिस्त पाळण्याशी संबंधित असतो. मुंबई फाल्कन्स ज्या प्रकारे तरुण भारतीयांना त्यांच्या आजच्या स्थितीपासून ते जिथे पोहोचू शकतात तिथपर्यंतचा प्रत्यक्ष मार्ग तयार करत आहे, हे ऐकल्यावर मला जास्त विचार करण्याची गरज भासली नाही. मला स्वतःला मोठे होताना अशा उपक्रमाची गरज होती आणि आता याचा भाग होताना मला अभिमान वाटत आहे,” असे मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडच्या नेतृत्वाखालील फॉर्म्युला १® ऑफिशियल इंडिया प्रोग्राम चा ब्रँड अॅम्बेसेडर श्रेयस अय्यर म्हणाले.
ब्रँड अॅम्बेसेडरच्या घोषणेबद्दल मत व्यक्त करत मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमित गधोके म्हणाले, “भारतात जागतिक दर्जाची क्रीडा प्रतिभा आहे, परंतु संरचनात्मक त्रुटींमुळे त्यांच्या संधी मर्यादित होत्या, या विश्वासातून आम्ही मुंबई फाल्कन्सची स्थापना केली. ‘एफ१® सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६‘ प्रत्यक्षात साकारण्यासाठी फॉर्म्युला १® सोबत भागीदारी करणे हे त्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. श्रेयस हा अशा प्रकारचा खेळाडू आहे, जो आमच्या उपक्रमाच्या कल्पनेत चपखल बसतो. त्याच्याकडे खेळातील नैपुण्य आणि शिस्तीसोबतच आजच्या उदयोन्मुख तरुण पिढीशी जोडले जाण्याची आपसूक क्षमता आहे. आम्ही जे व्यासपीठ लाँच करणार आहोत ते भारताने या क्षेत्रात यापूर्वी कधीही पाहिले नाही. या उपक्रमाची संपूर्ण व्याप्ती लवकरच जाहीर केली जाईल.”
ही चॅम्पियनशिप एफआयए फॉर्म्युला १® वर्ल्ड चॅम्पियनशिप™चा अधिकृत गेम असलेल्या एफ१® २५‘ वर खेळली जाईल. यामध्ये जागतिक सिरीजप्रमाणेच सर्किट्स, स्पर्धात्मक फॉरमॅट्स आणि टीम लिव्हरीज असतील. नोंदणी ३० एप्रिल २०२६ पासून प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एमएफआरएल अॅपद्वारे सुरू होईल. सहभागी स्पर्धक पीसी, प्लेस्टेशन ५ आणि एक्सबॉक्सद्वारे यात स्पर्धा करू शकतील. येत्या काही महिन्यांतील ऑनलाइन पात्रता फेऱ्यांनंतर शहरांमधील सिम्युलेटर फेऱ्या होतील आणि नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीने (नॅशनल फायनल) या स्पर्धेचा समारोप होईल.
हा आगामी उपक्रम आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी देशव्यापी प्रकल्प आहे, जो भारतातील तरुणांना एका स्पष्ट मार्गाद्वारे जागतिक स्तरावरील स्पर्धेशी जोडण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.





