प्रादेशिक भागांवर अधिक लक्ष देण्यासाठी आणि उच्च-वाढीच्या, भविष्यासाठी सज्ज असलेल्या बाजारपेठांचा लाभ घेण्यासाठी एसबीआयचे नवीन एलएचओ

By: Abhi

On: Saturday, April 25, 2026 2:37 PM

Sbi एसबीआय
Google News
Follow Us

 

  • पुणे येथे नवीन स्थानिक मुख्यालयाची स्थापना हे ‘विकसित भारत 2047’च्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एसबीआय कशा प्रकारे वाटचाल करत आहे, याचे एक निदर्शक आहे. – श्रीमती निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
  • “या नवीन स्थानिक मुख्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात एसबीआयची अधिक बळकट झालेली उपस्थिती, ही राज्य सरकारच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.” – श्री. एम. नागराजू, डीएफएस सचिव
  • “हे पाऊल अत्यंत समयोचित आणि दूरदृष्टीचे आहे; कारण आपली ताळेबंदाची व्याप्ती देशाच्या GDP च्या 20 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट एसबीआय बाळगून आहे.” – श्री. सी.एस. शेट्टी, अध्यक्ष, एसबीआय
  • विविध प्रकल्पांना साहाय्य करण्याच्या उद्देशाने, एसबीआयने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत 22.15 कोटी रुपयांची देणगी दिली.

 

देशातील सर्वात मोठी कर्जदाती संस्था असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुण्यात आपल्या स्थानिक मुख्यालयाच्या उद्घाटनाची घोषणा केली. प्रादेशिक ठिकाणी बँकेची उपस्थिती अधिक दृढ करणे, ग्राहक सेवा वितरण सुधारणे आणि आपल्या विकासाच्या प्रवासाला गती देणे या दिशेने सुरू असलेल्या बँकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

माननीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आणि माननीय सचिव – वित्तीय सेवा विभाग श्री. एम. नागराजू, एसबीआयचे अध्यक्ष श्री. चाल्ला श्रीनिवासुलु शेट्टी, एसबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक – महाराष्ट्र मंडळ श्री. नंद किशोर सिंह आणि महाराष्ट्राच्या खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी यांच्यासह एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत या स्थानिक मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

एका प्रमुख आर्थिक क्षेत्रात आपल्या कार्यक्षमता बळकट करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाची कटिबद्धता पुणे मुख्यालयाची स्थापना अधोरेखित करते. या अत्याधुनिक सुविधेमध्ये या मंडळाची प्रमुख प्रशासकीय आणि कार्यात्मक कार्ये हाताळली जातील. ही सर्वसमावेशक रचना एकत्रितपणे अधिक अखंड, प्रतिसादक्षम आणि विस्तारक्षम बँकिंग अनुभव प्रदान करण्यास सक्षम करेल. प्रादेशिक केंद्रांवर अधिक लक्ष देण्यासाठी, मुंबई सर्कलमधून महाराष्ट्र सर्कलची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई मुख्यालय देशाची आर्थिक राजधानी आणि गोवा या क्षेत्रांना सेवा देणे सुरूच ठेवेल, तर पुणे मुख्यालय उर्वरित महाराष्ट्राला सेवा पुरवेल.

स्थानिक मुख्यालयाचे उद्घाटन करताना, माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन म्हणाल्या, “राज्याच्या पूर्व आणि आग्नेय भागातील जिल्ह्यांसह, उर्वरित महाराष्ट्राला सेवा देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले स्थानिक मुख्यालय पुण्यात हलविण्याचा घेतलेला निर्णय, बँकेचा जलद, गतिमान आणि प्रतिसादक्षम दृष्टिकोन दर्शवतो. हे पाऊल म्हणजे ‘विकसित भारत 2047’च्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एसबीआय कशा प्रकारे वाटचाल करत आहे, याचेच निदर्शक आहे.”

या समारंभात आपले विचार मांडताना, वित्तीय सेवा विभागाचे श्री. एम. नागराजू म्हणाले, “या नवीन स्थानिक मुख्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अधिक बळकट झालेली एसबीआयची उपस्थिती, ही राज्य सरकारच्या आर्थिक विकासाच्याच दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात सुरू झालेल्या या नवीन कार्यालयामुळे सर्वसामान्यांना आर्थिक निर्णय घेणे सोपे होईल. वाणिज्य, तंत्रज्ञान आणि संधी या तिन्ही घटकांसाठी अगदी पोषक वातावरणात ही बँक आहे. एसबीआय ही एक अशी संस्था आहे, जी भारताच्या विकासगाथेसाठी अविरत प्रयत्न करते आहे; जिची बॅलन्सशीट भारताच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 20%चे प्रतिनिधित्व करते आणि जिचा ग्राहकवर्ग देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 35% एवढा आहे.”

या घडामोडीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष, श्री. चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी म्हणाले: “पुण्यातील स्थानिक मुख्यालयाचे उद्घाटन हे आमच्या ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्याच्या आणि प्रादेशिक संधींना अधिक प्रतिसाद देण्याच्या आमच्या हेतूचे प्रतीक आहे. एसबीआय आपली बॅलन्सशीट देशाच्या जीडीपीच्या सध्याच्या २०% वरून २५% पर्यंत वाढवण्याचे ध्येय बाळगत असताना, हे पाऊल योग्य वेळी आणि दूरदृष्टीने उचलण्यात आले आहे, कारण महाराष्ट्रात प्रचंड आर्थिक क्षमता आहे आणि ते भारताच्या आर्थिक घडामोडी, तसेच देशाच्या महत्त्वाकांक्षेच्या व्याप्तीचे एक प्रमुख निदर्शक आहे. या महाराष्ट्र सर्कलमध्ये पुण्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

ठेवींमध्ये २७% आणि कर्जांमध्ये ३४%, जे आमच्या व्यवसायातील पुण्याची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करते. पुणे हे भारतातील शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक म्हणून विकसित झाले आहे. आयटी, अभियांत्रिकी आणि ऑटोमोटिव्ह नवोपक्रमाचे एक भरभराटीचे केंद्र म्हणूनही हे ओळखले जाते. त्यामुळे पुण्यात स्थानिक मुख्यालय स्थापन करणे हे उच्च-वाढीच्या भविष्यासाठी सज्ज असलेल्या परिसंस्थेशी धोरणात्मकदृष्ट्या जोडलेली आहे.”

भारत सरकारच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनाला एसबीआयकडून मिळणाऱ्या निरंतर पाठिंब्याचे प्रतिबिंब म्हणजे हा उद्घाटन समारंभ. आपल्या प्रादेशिक विस्ताराला बळकटी देऊन, पायाभूत सुविधा, कृषी, एमएसएमई आणि उदयोन्मुख उद्योग यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना आधार देत, या भागाच्या आर्थिक विकासात अर्थपूर्ण योगदान देण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. पुणे स्थानिक मुख्यालय हे बँकेची व्याप्ती, सेवांमधील उत्कृष्टता आणि नावीन्य यांप्रती असलेल्या अढळ वचनबद्धतेचा एक पुरावा आहे व याद्वारे भारतातील अग्रगण्य बँकिंग संस्था म्हणून बँकेचे नेतृत्व अधिकच दृढ होते.

या खास प्रसंगाचा एक भाग म्हणून एसबीआयने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत जलसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण, ग्रामीण उपजीविका, सामुदायिक कल्याण आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध प्रकल्पांना साहाय्य करण्यासाठी 22.15 कोटी रुपयांची देणगी दिली.

या कार्यक्रमादरम्यान, माननीय अर्थमंत्र्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला समर्पित अशा एका विशेष टपाल तिकिटाचेही अनावरण केले. बँकेचे आर्थिक समावेशन, नावीन्य आणि ग्राहकसेवेप्रती असलेली अतूट बांधिलकी याप्रती दर्शविलेली ही कृतज्ञता आहे.

Abhi

Abhi quietly focused, effortlessly real. Building his own path, one step at a time. ✨
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now