Heat Wave Alert : काळजी घ्या! राज्यात उष्णतेची लाट; १८-१९ एप्रिलला पावसाची शक्यता

By: Editor_Pratik

On: Wednesday, April 15, 2026 12:20 PM

Google News
Follow Us

Heat Wave Alert : काळजी घ्या! राज्यात उष्णतेची लाट; १८-१९ एप्रिलला पावसाची शक्यता

पुणे | प्रतिनिधी : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, १७ एप्रिल हा एप्रिल महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह बहुतांश शहरांमध्ये तापमानात दररोज १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र १८ आणि १९ एप्रिल रोजी काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकतो.

🔥 कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेचा फटका?

१६ एप्रिल :
सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा

१७ एप्रिल :
जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा

१८ एप्रिल :
जळगाव, संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सोलापूर

☀️ उष्णतेच्या लाटेत काय काळजी घ्यावी?

  • तहान नसली तरी नियमित पाणी प्या
  • डोके, मान आणि चेहरा झाकूनच बाहेर पडा
  • टरबूज, काकडी, संत्री यांसारखी पाण्याची फळे खा
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, पंखे, ओले कापड वापरा
  • हलके व सुती कपडे परिधान करा
  • छत्री, टोपी आणि गॉगलचा वापर करा
  • लिंबूपाणी, ताक, पन्हे, ORS यांचा आहारात समावेश करा

⚠️ काय टाळावे?

  • दारू, चहा, कॉफी व साखरयुक्त पेये टाळा
  • दुपारी १२ ते ३ दरम्यान बाहेर जाणे टाळा
  • उन्हात जास्त श्रम करू नका
  • शिळे व जड अन्न टाळा
  • गडद व जाड कपडे घालू नका
  • अनवाणी बाहेर पडू नका

नागरिकांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now