इमारतीवरून ढकलल्याने कामगाराचा मृत्यू; सहकारी ताब्यात

By: Editor_Manas

On: Monday, March 30, 2026 5:47 PM

Google News
Follow Us

पिंपरी | प्रतिनिधी – मानस : पिंपरीतील वाल्हेकरवाडी परिसरात इमारत दुरुस्तीचे काम सुरू असताना झालेल्या वादातून एका कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

केशवकुमार मोहन महतो (वय २६, रा. चिखली, मूळ बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पुनीतराम शुक्ला (वय २७, रा. चिखली, मूळ मुजफ्फरनगर, बिहार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीवर दुरुस्तीचे काम सुरू असताना दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि त्यावेळी आरोपीने महतो यांना दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या महतो यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चिंचवड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026