जुन्नर शिक्षक पतसंस्थेच्या मोबाईल ॲप सुविधेचा शुभारंभ; डिजिटल सेवांना गती

By: Editor_Manas

On: Tuesday, March 24, 2026 10:22 AM

Google News
Follow Us

जुन्नर : सुमारे १०२ वर्षांची परंपरा लाभलेल्या जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मोबाईल ॲप सुविधेचा शुभारंभ जुन्नर येथील राजा शिवछत्रपती सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख, तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके आणि सेवानिवृत्त सहनिबंधक तानाजी कवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थेचे सभापती सचिन मुळे यांनी सांगितले की, नव्या मोबाईल ॲपमुळे सभासदांना त्यांच्या खात्यांची सर्व माहिती तसेच संस्थेच्या विविध सेवांचा तपशील ऑनलाईन स्वरूपात सहज उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमात बोलताना अमित बेनके यांनी जुन्नर शिक्षक पतसंस्था ही तालुक्यातील आदर्श संस्था असल्याचे सांगत, तिच्या शतकोत्तर वाटचालीचे कौतुक केले. डॉ. गजेंद्र देशमुख यांनी संस्थेचे कामकाज पारदर्शक व आदर्श असल्याचे नमूद करत, शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

तानाजी कवडे यांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या तुलनेत या पतसंस्थेचा नफा दर अधिक असल्याचे सांगत, संस्थेच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला. पुणे जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे पदाधिकारी, तालुका व जिल्हा प्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती संतोष पाडेकर यांनी केले, तर उपसभापती सविता कुऱ्हाडे यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 4, 2026

July 3, 2026

July 3, 2026

July 3, 2026

June 30, 2026

June 30, 2026