‘सिंधी प्रीमिअर लीग’चे सातवे पर्व रंगणार १० एप्रिलपासून सामाजिक एकोप्याच्या भावनेतून आयोजन; सातव्या हंगामात १६ पुरुष, सात महिला संघ खेळणार

By: Editor_Manas

On: Monday, March 16, 2026 1:11 PM

Google News
Follow Us

पिंपरी (पुणे) : सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे सातवे पर्व यंदा १० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. या स्पर्धेत यंदा १६ पुरुष, तर सात महिला संघ सहभागी होणार आहेत. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहता येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे नरेश नशा व बिपीन दखनेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रावेत येथील हॉटेल ब्ल्यू वॉटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेवेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजन समितीतील रोनक पंजाबी, अविनाश इसरानी, अंकुश मुलचंदानी, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, मनीष गेरेजा, यश थडानी, कंवल खियानी, गुलशन गंगवानी, कामेश पमनानी, पवन कोटवानी, मयूर तिलवानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

डब्बू आसवानी म्हणाले, “सिंधी समाजातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा आता समाजाचा एक महोत्सव झाला असून, निरोगी व व्यसनमुक्त आयुष्य, तंदुरुस्ती याविषयी समाजात जागरूकता वाढत आहे. मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्रोत्साहन मिळत आहे. या स्पर्धेतून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग होत आहे. यंदा या स्पर्धेतून उभा राहणाऱ्या निधीतून साधू वासवानी मिशन येथील एका विद्यार्थिनीचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले जाणार आहे.”

श्रीचंद आसवानी म्हणाले, “या ‘सिंधी प्रीमिअर लीग सीजन-७’चे उद्घाटन १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. गेल्या सातही हंगामात या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यासह राज्यभरातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महिलांनाही खेळासाठी प्रोत्साहन दिले जात असून, यंदा महिलांचे सात संघ स्पर्धा खेळणार आहेत.

बिपीन दखनेजा म्हणाले, “आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. पुरुषांचे १६ संघमालक व महिलांचे सात संघमालक आपल्या २३ संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष संघांची नवे सिंधी संस्कृतीवर आधारित, तर महिला संघांची नावे नद्यांवर आधारित आहेत. महिलांमध्ये ९८, तर पुरुषांमध्ये २५६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.”

——————————————-

असे आहेत १६ पुरुष, ७ महिला संघ

या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (एए प्रमोटर्स अँड बिल्डर्स, हिरानंद आसवानी), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम डेव्हलपर्स, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (जीएस असोसिएट्स, जितू पहलानी), एसएसडी फाल्कन (विक्रम रोहेडा फोटोग्राफी, विक्रम रोहेडा), इंडस डायनामॉस (साईबाबा सेल्स, रोहन गेहानी), दादा वासवानीज ब्रिगेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, श्रीचंद आसवानी), झुलेलाल सुपरकिंग्ज (गोगिया ग्रुप, सनी गोगिया), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (ट्रिओ ग्रुप, कमलेश पमनानी), गुरुनानक नाइट्स (पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड, प्रकाश रामनानी), संत कंवरम रॉयल्स (विजयराज असोसिएट्स, क्रिश लाडकानी), आर्यन्स युनायटेड (आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स, अनिल आसवानी), जय बाबा स्ट्रायकर्स (सुखवानी असोसिएट्स, सागर सुखवानी), सिंधी इंडियन्स (मनसुखवानी असोसिएट्स, मनीष मनसुखवानी), अजराक सुपरजायंट्स (लाइफक्राफ्ट रियल्टी, हितेश दादलानी) व पिंपरी योद्धाज (कुणाल कम्युनिकेशन्स, कुणाल लखानी) अशी या संघांची नावे आहेत. महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स (दीक्षा खुबचंदानी, दीपक खुबचंदानी), गोदावरी जायंट्स (प्रेरणा गौरव रामचंदानी, जया प्रकाश रामचंदानी), झेलम क्वीन्स (शिखा व रॉकी सेवानी), सिंधू स्टारलेट्स (मनीषा अँड बिपीन दखनेजा), यमुना स्ट्रायकर्स (रिया व पवन कोटवानी), नर्मदा टायटन्स (रेशम वाधवानी व सपना मेलवानी), कृष्णा सुपरनोव्हाज (युवीना गेरेजा अँड मनीष गेरेजा) यांचा समावेश आहे.

——————————————-

स्पर्धेला यांचा भक्कम हातभार 

सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), सिटी कार्स (रॉकी शेवानी), ग्रोफीन (अभिजित बोंगिरवार), सिंग स्टील अँड अल्युमिनियम (मनजीत सिंग वालेचा), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), रामा ग्रुप (रोनक व मनोज पंजाबी), रोहित इन्फ्रा (राजीव मोटवानी), एआर रियल्टी (संजय रामचंदानी), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), सिंधू स्काईज (विनोद चांदवानी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), सच्चिदानंद प्रॉपर्टीज (मुकेश मलिक), झमतानी अँड कंपनी (अमित झमतानी), इको मॅट्रिक्स (सचिन तलरेजा), आर्को रियल्टी (रवी ओचानी), विक्रम रोहिडा फोटोग्राफी, सीजे हब (चिनू जैन) यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे.

—————————————–

५६ वर्षांचा खेळाडू मैदानात

हॉलीबॉल, क्रिकेट खेळात, तसेच राजकारणात यशस्वी कारकीर्द करणारे हिरानंद उर्फ डब्बू आसवानी हे ५६ वर्षांचे खेळाडू सिंधी प्रीमिअर लीगच्या मैदानात उतरले आहेत.  सुलतान ऑफ सिंध या संघाने ५६ वर्षांच्या डब्बू आसवानी, तर सर्वात कमी १५ वर्षाच्या ऋषभ वाधवानी याला आपल्या संघात घेतले आहे. खेळामुळेच राजकारणातही यशस्वी ठरलो होतो. शारीरिक तंदुरुस्तीही चांगली  राहते.त्यामुळे सातत्याने खेळात राहतो, असे आसवानी यांनी नमूद केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 8, 2026

April 8, 2026

April 7, 2026

किर्लोस्कर

April 7, 2026

टाटा एआयए

April 7, 2026

April 6, 2026