अ‍ॅक्सिस बँकेच्या ‘स्प्लॅश २०२५’ स्पर्धेत महाराष्ट्रातील पाच मुले विजेती; बँकेकडून सत्कार

By: Editor_Manas

On: Wednesday, March 11, 2026 5:30 PM

Google News
Follow Us

राष्ट्रीय, 11 मार्च 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने देशभरातील 7-14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. कला, हस्तकला आणि साहित्याशी संबंधित स्प्लॅश 2025 च्या 13 व्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ‘दिल से ओपन’ या ब्रँड तत्त्वज्ञानावर आधारित स्प्लॅश भारतातील तरुणांच्या सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देते.

‘क्राफ्ट’ (हस्तकला) विभागात, 7 ते 10 वयोगटात ठाण्याच्या श्रुती सिद्धार्थ घोष हिने प्रथम, तर पुण्याच्या प्रियांश छाजेडने दुसरा क्रमांक पटकावला. याच विभागात, 11 ते 14 वयोगटात पुण्याच्या सानिका छाजेडने प्रथम क्रमांक पटकावला, तर पुण्याचीच आराध्या प्रदीप रामेकर द्वितीय विजेती ठरली. ‘साहित्य’ विभागातील 11 ते 14 वयोगटात ठाण्याचा अक्षय उपविजेता ठरला.

‘SPLASH’ च्या यंदाच्या पर्वाला प्रचंड प्रतिसाद लाभला; यामध्ये संपूर्ण भारतातून जवळपास 7 लाख प्रवेशिका (entries) आल्या होत्या. या उपक्रमाचा विस्तार 1,900 हून अधिक शाळांपर्यंत झाला आहे. तर देशभरातील ॲक्सिस बँकेच्या 5,500 हून अधिक शाखांमार्फत यात सहभाग नोंदवला गेला. यावरून तळागाळापर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे, हे अधोरेखित होते.

सहा विजेते आणि सहा उपविजेत्यांना बक्षीस म्हणून अनुक्रमे ₹1 लाख आणि ₹50,000 इतकी रक्कम मिळेल. विजेत्या कलाकृती ‘म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी’ (MAP), बेंगळुरू येथे प्रदर्शित केल्या जातील. तर 400 सर्वोत्तम स्पर्धकांना इक्सिगो (Ixigo) आणि अमेरिकन टूरिस्टर (American Tourister) यांसारख्या सहयोगी ब्रँड्सकडून आकर्षक भेटवस्तू आणि व्हाउचर्स मिळतील.

या प्रसंगी ॲक्सिस बँकेचे मुख्य विपणन अधिकारी (CMO) अनुप मनोहर म्हणाले, “SPLASH ही केवळ स्पर्धा नाहीतर त्यापेक्षाही जास्त आहे— हा  कल्पनाशक्ती आणि आत्म-अभिव्यक्तीचा एक उत्सव आहे. SPLASH 2025 ला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा देशभरातील मुलांमध्ये दडलेल्या अफाट सर्जनशील क्षमतेचे प्रतिबिंब आहे. तरुण सर्जनशील मनांना शिकण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊनआम्ही त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि आपल्या आवडीनिवडींचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करण्याची आशा बाळगतो.”

या प्रवेशिकांचे मूल्यांकन 100 हून अधिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका प्रतिष्ठित परीक्षक मंडळाद्वारे करण्यात आले. या मंडळात ‘अमर चित्र कथा’चे ग्रुप आर्ट डायरेक्टर श्री. सॅव्हिओ मस्कारेन्हास, ‘रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स’च्या संचालिका डॉ. स्नेहल पिंटो आणि ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चे मानद उपाध्यक्ष श्री. दीपक पाटील यांचा समावेश होता.

प्रत्येक आवृत्तीगणिक ‘SPLASH’ ची गुणवत्ता आणि विस्तार होतो आहे. मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या सर्जनशील उपक्रमांमध्ये त्याचा समावेश होतो. सर्वांगीण विकास आणि समाजाशी अर्थपूर्ण जोडणीबाबतची ऍक्सिस बँकेची कटिबद्धता हा उपक्रम अधोरेखित करतो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026