‘फिटल नेक्सस २०२६’ : प्रजनन जनुकशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद पुण्यात संपन्न

By: Editor_Manas

On: Thursday, March 19, 2026 8:45 AM

Google News
Follow Us

पुणे, मार्च २०२६ : “फिटल नेक्सस २०२६  – रिप्रॉडक्टीव्ह जेनेटिक्स इन क्लिनिकल प्रॅक्टिस  या विषयावरील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद पुण्यात यशस्वीरित्या पार पडली. या परिषदेत भ्रूण वैद्यकशास्त्र (फीटल मेडिसिन) आणि प्रजनन जनुकशास्त्रातील (रिप्रॉडक्टीव्ह जेनेटिक्स ) नव्या घडामोडींवर देश-विदेशातील तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली.

ही परिषद सोसायटी ऑफ फिटल मेडिसिन – ग्रेटर पुणे चॅप्टर यांच्या वतीने, महा एनएमओ  पुणे आणि उमरजी मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ प्रा.टाक युईंग लुईंग आणि प्रा. क्योंग वाई चॉय यांनी गर्भावस्थेतील जनुकीय तपासण्या, फीटल डायग्नोस्टिक्स आणि मातृ-भ्रूण वैद्यकातील नव्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ.अशोक खुराना (मेंटॉर एमेरिटस, सोसायटी ऑफ फिटल मेडिसिन) आणि डॉ. मोहित शाह (राष्ट्रीय अध्यक्ष, सोसायटी ऑफ फिटल मेडिसिन) यांनी केले.

या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील अडवाणी उपस्थित होते. तसेच डॉ. प्रमोद उमरजी, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. चिन्मय उमरजी (अध्यक्ष – एसएफएम ग्रेटर पुणे चॅप्टर) आणि डॉ. वरुण ठाकूर (सचिव – एसएफएम  पुणे चॅप्टर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वैज्ञानिक सत्रांमध्ये नॉन-इनवेसिव्ह प्रीनेटल स्क्रिनिंग (एनआयपीएस), आधुनिक फीटल इमेजिंग, जनुकीय तपासणी तंत्रज्ञान, जन्मजात विकारांचे निदान तसेच जनुकीय आजारांवरील उदयोन्मुख उपचार पद्धती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मांडणी करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना डॉ. अशोक खुराना यांनी नमूद केले की, प्रजनन जनुकशास्त्र आणि फीटल डायग्नोस्टिक्स मधील प्रगतीमुळे गर्भावस्थेतील आजारांचे लवकर व अचूक निदान शक्य होत असून, यामुळे माता व बाळ दोघांसाठीही उपचार आणि सल्लामसलत अधिक प्रभावी होत आहे.

डॉ. चिन्मय उमरजी यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदांमुळे जागतिक तज्ज्ञता भारतात उपलब्ध होते आणि मातृ-भ्रूण आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी सहकार्य अधिक बळकट होते.

या परिषदेत प्रा. शुभा फडके यांनी बालमृत्यू दर कमी करण्यासाठी पेरिनेटल पॅथॉलॉजीचे महत्त्व अधोरेखित केले, तर डॉ. वंदना बन्सल यांनी पुनरावृत्ती होणाऱ्या गर्भपाताच्या (रीकरंट प्रेग्नेंसी लॉस ) व्यवस्थापनासाठी योग्य क्लिनिकल दृष्टिकोनावर मार्गदर्शन केले.

यावेळी माजी अध्यक्ष डॉ. बिमल सहानी, डॉ. संदीप पानसरे आणि डॉ. योगेश चौधरी, तसेच वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. रमेश भोसले, प्रा. उमा वानखेडे, प्रा. मीनल पाटवेकर आणि डॉ. मंगला वाणी यांच्यासह देशभरातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते.

आयोजकांनी सांगितले की, फिटल नेक्सस २०२६  ही परिषद आधुनिक प्रसूतीशास्त्रात जनुकीय विज्ञानाचा प्रभावी समावेश करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली असून, यामुळे मातृ आणि भ्रूण आरोग्य सेवांना नवे बळ मिळणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News