सीडीएसएल आयपीएफ आणि बीएसई आयपीएफतर्फे छत्रपती संभाजी नगरमध्ये प्रादेशिक गुंतवणूकदार जागरुकता सेमिनार

छत्रपती संभाजी नगर, फेब्रुवारी 2026: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) अंतर्गत CDSL इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF) आणि BSE इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (BSE IPF) यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे संयुक्तपणे एका मेगा रीजनल इन्व्हेस्टर अवेअरनेस सेमिनारचे (मेगा RISA) आयोजन केले होते. यात पोलीस कर्मचारी, CRPF कर्मचारी, सरकारी कर्मचारी, MGM विद्यापीठाचे प्राध्यापक आणि इतर सामान्य गुंतवणूकदार एकत्र आले होते.

“शिक्षित से सक्षम” या विषयावरील या चर्चासत्राचा उद्देश सिक्युरिटीज मार्केट, गुंतवणूकीचे उपलब्ध मार्ग आणि सायबर सुरक्षेच्या आवश्यक पैलूंबद्दलची समज वाढवणे – वाढत्या गतिमान बाजारपेठेच्या वातावरणात माहितीपूर्ण आणि जबाबदार आर्थिक निर्णय घेण्याचे महत्त्व अधिक दृढ करणे हा होता.

या कार्यक्रमाला सेबीचे कार्यकारी संचालक श्री. सुनील कदम; सेबीचे एजीएम श्री. राहुल केलापुरे; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. रणजीत पाटील; पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. विनयकुमार राठोड; गुन्हे विभागाचे डीसीपी श्री. रत्नाकर नवले; आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

सीडीएसएलच्या उपाध्यक्षा श्रीमती मीना पेडणेकर यांनी उद्घाटन प्रसंगी भाषण केले, ज्यात त्यांनी “शिक्षित से सक्षम” ही थीम ‘आत्मनिर्भर गुंतवणूकदार’ निर्माण करण्याच्या उद्देशाशी जोडली. सीडीएसएल आयपीएफच्या मुख्य भूमिकेशी हे सुसंगत आहे. गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि संरक्षण मजबूत करण्यासाठी सेबी, सीडीएसएल, बीएसई आणि सर्व एमआयआयच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.

बीएसई इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडचे प्रमुख श्री. खुशरो बुलसारा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्यामध्ये गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि एकूणच गुंतवणूकदार संरक्षण चौकटीला बळकटी देण्यासाठी बीएसई आयपीएफची दृढ वचनबद्धता अधोरेखित केली. त्यांनी गुंतवणूकदारांसाठी एआय आणि त्याच्या ज्ञानाचे महत्त्व देखील स्पष्ट केले.

या चर्चासत्राला उत्साही प्रतिसाद मिळाला. पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, महानगरपालिका आणि एमजीएम विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी असे सुमारे 850 हून अधिक लोक यात सहभागी झाले होते. संपूर्ण सत्रांमध्ये, वक्त्यांनी आर्थिक जागरूकता, डिजिटल दक्षता आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात एक सुजाण आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूकदार समुदाय निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला या चर्चेने बळकटी दिली.

ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आर्थिक साक्षरता तसेच डिजिटल दक्षता प्रत्येकासाठी, विशेषतः कायदा अंमलबजावणी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे यावर भर दिला. या ज्ञानामुळे अधिकाऱ्यांचे वैयक्तिक आर्थिक नियोजन तर भक्कम होतेच आणि आर्थिक फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळण्याची त्यांची क्षमता वाढते.

मार्केटमधील प्रवेश अधिक सुलभ होत असताना गुंतवणूकदार जागरूकतेची वाढती गरज सेबीचे कार्यकारी संचालक श्री. सुनील कदम यांनी अधोरेखित केली. जबाबदार आर्थिक वर्तनाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि बाजारातील आत्मविश्वास बळकट करणाऱ्या संरचित शिक्षण कार्यक्रमांद्वारे नागरिक तसेच संस्थात्मक भागधारकांना सक्षम बनवण्यासाठी सीडीएसएल आयपीएफ आणि बीएसई आयपीएफच्या संयुक्त प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

“देशभरात आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि आत्मविश्वासू गुंतवणूकदार समुदाय निर्माण करण्यासाठी सेबी दृढपणे वचनबद्ध आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एनआयएसएम सोबत संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय वित्तीय साक्षरता प्रश्नमंजुषा 2026 सारख्या उपक्रमांद्वारे, आम्ही माहितीपूर्ण गुंतवणुकीचा पाया मजबूत करत आहोत. पंचायती राज मंत्रालयासोबतच्या आमच्या सहकार्यामुळे आम्हाला ग्रामीण आणि निम-शहरी समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, ज्यामुळे वित्तीय साक्षरता तळागाळात सुलभरित्या पोहोचण्यासोबतच सर्वसमावेशक आणि प्रभावी होईल याची खात्री होते.”

सायबर फसवणुकीवरील एक सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी डीसीपी (गुन्हे) श्री. रत्नाकर नवले यांनी उदयोन्मुख डिजिटल धोके, सामान्य फसवणूक तंत्रे आणि वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागींना सायबर सक्षम आर्थिक गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता आणि तयारी वाढविण्यास मदत झाली. भांडवली बाजारातील तज्ज्ञांनी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या विषयावर सविस्तर भाषण दिले, ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे हक्क, नियामक सुरक्षा उपाय, तक्रार निवारण यंत्रणा, अनियमित उत्पादनांशी संबंधित जोखीम इत्यादींसह सिक्युरिटीज मार्केटच्या प्रमुख पैलूंचा समावेश होता. एकत्रितपणे, या सत्रांच्या माध्यमातून सहभागींना मार्केटच्या कार्यप्रणालीची स्पष्ट समज आणि आर्थिक फसवणूक ओळखण्यासाठी, रोखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी व्यावहारिक साधने प्रदान केली.

देशभरातील आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी सीडीएसएल आयपीएफ आणि बीएसई आयपीएफच्या सातत्यपूर्ण  प्रयत्नांचा हा हा सेमिनार एक भाग आहे.