ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 25 फेब्रुवारी 2026 पासून होणार सुरू

By: Editor_Manas

On: Tuesday, February 24, 2026 11:05 AM

Google News
Follow Us

राष्ट्रीय, 20 फेब्रुवारी 2026: ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेड (“कंपनी”) ने 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) बुधवार 25 फेब्रुवारी 2026 पासून प्राथमिक समभाग विक्री (“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांची बोली एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 ला सुरु होणार आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 27 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल.

ओमनीटेक इंजीनीअरिंग लिमिटेडचा प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 216 रुपये ते प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 227 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 66 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या 66 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

या ऑफरमध्ये एकूण 4,180.00 दशलक्ष रु. (418 कोटी रु.)पर्यतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विद्यमान समभागभागधारक उदयकुमार अरुणकुमार पारेख (“प्रवर्तक विक्री समभागभागधारक”) यांच्याकडून 1,650.00 दशलक्ष रु. (165 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल यांचा समावेश आहे.

या ऑफरमध्ये 10.00 दशलक्ष रु. पर्यतच्या 5 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचे आरक्षण समाविष्ट आहे (ऑफरनंतरच्या पेडअप इक्विटी शेअर भांडवलाच्या जास्तीत जास्त 5% इतके). हे पात्र कर्मचाऱ्यांनी सदस्यत्वासाठी (कर्मचारी आरक्षण/राखीव भाग) राखीव ठेवलेले आहेत.

कर्मचारी राखीव हिस्स्यामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 11 रु. ची सवलत देण्यात येणार आहे.

कंपनी ही ऊर्जा, मोशन कंट्रोल आणि ऑटोमेशन, औद्योगिक उपकरण प्रणाली, मेटल फॉर्मिंग आणि इतर विविध औद्योगिक उपाययोजना अशा उद्योगांमधील जागतिक ग्राहकांना पुरवठा करणाऱ्या उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक आहे. 19 वर्षांच्या अनुभवासह, कंपनी उच्च अभियांत्रिकी केलेले अचूक मशिनिंग केलेले घटक आणि असेंब्लीज तयार करते. हे प्रामुख्याने सुरक्षा विषयक महत्त्वाच्या उपयोजनांमध्ये वापरले जातात. ICRA अहवालानुसार, कामकाजामधील महसूलाच्या दृष्टीने ओळखलेल्या समकक्ष गटामध्ये कंपनी ही भारतातील उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजची सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादकांपैकी एक आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024 आणि आर्थिक वर्ष 2025 दरम्यान 92.45% वाढ नोंदवली आहे आणि आर्थिक वर्ष 2023 ते आर्थिक वर्ष 2025 दरम्यान 39.06% CAGR साध्य केला आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत तसेच आर्थिक वर्ष 2025, 2024 आणि 2023 दरम्यान, कंपनीने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, भारत, संयुक्त अरब अमिरात, जर्मनी, बल्गेरिया, स्वीडन, युनायटेड किंगडम, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसह 24 देशांतील 256 हून अधिक ग्राहकांना सानुकूलित उच्च अचूकता अभियांत्रिकी घटक आणि असेंब्लीजचा पुरवठा केला आहे.

ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली  जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(1) च्या नियमना

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now